खबरदार.. शाळा व कॉलेज च्या आवारात येणाऱ्या रोमियोवर करणार कारवाई-बारामती शहर पोलीसाचा इशारा.. शाळेच्या आवारात मुली वरून भांडण करणारे जूनियर रोमियो वर गुन्हा दाखल.... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 25, 2022

खबरदार.. शाळा व कॉलेज च्या आवारात येणाऱ्या रोमियोवर करणार कारवाई-बारामती शहर पोलीसाचा इशारा.. शाळेच्या आवारात मुली वरून भांडण करणारे जूनियर रोमियो वर गुन्हा दाखल....

खबरदार.. शाळा व कॉलेज च्या आवारात येणाऱ्या रोमियोवर करणार कारवाई-बारामती शहर पोलीसाचा इशारा.. शाळेच्या आवारात मुली वरून भांडण करणारे जूनियर रोमियो वर गुन्हा दाखल....                                                                                                                      बारामती:- सध्या गुन्हेगारी वाढत चालली असून तरुणाई वर कोणा भाईचा, दादाचा हात असतो, त्यामुळे हे तरुण मुले नशाबाजी करीत कॉलेज व शाळा या परिसरात विनाकारण फिरत असतात व भांडण करणे,गाड्या फास्ट चालविणे असले प्रकार सर्रास चालू असून त्यामुळे मुली सुरक्षित आहे की नाही हे मुलीच्या  पालकांना चिंता लागून राहते, अश्या अनेक घटना घडत असून त्याची दखल घेत बारामती शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी चांगला निर्णय घेतला याबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले आहे, अशी घटना नुकताच घडली श्रीराम नगर मधील कवी मोरोपंत शाळेसमोर. यातील फिर्यादी हा या शाळेतील मुलींचा मानलेला भाऊ. आरोपी सुरज तानाजी मोरे जळोची वय 21 वर्ष कायम शाळा सुटण्याच्या वेळेस शाळेच्या आवारात फिरणारा विलन म्हणा किंवा हिरो म्हणा . तो मुलांसमोर फिरतो म्हणून त्याने (फिर्यदिने)त्याला शाळेसमोर बोलावून घेतले . दोघांचे त्या ठिकाणी बोलल्यानंतर बाचाबाची सुरू झाली. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले.दोन्ही बाजूचे लोक जमा झाले . सोडवा सोडवी सुरू असताना पोलिसांना कॉल गेला. तात्काळ बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस त्याठिकाणी केली. त्या ठिकाणावरून आरोपी सुरज तानाजी मोरे याला व फिर्यादी याला पोलीस स्टेशनला ताब्यात घेतले. आरोपी याने तथाकथित दादा समजणारा बाबा मदने याला त्याठिकाणी बोलून घेतले होते. पोलीस पाहताच तो त्या ठिकाणावरून रफूचक्कर झाला. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर फिर्यादीला मारहाण केली म्हणून सूरज तानाजी मोरे, अभिषेक रावसाहेब मोकाशी व बाबा मदने यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नंबर 32/22 भा द वी 324 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. कॉलेजची मुले आहे म्हणून त्या ठिकाणी सोडण्याबाबत विनवण्या करण्यात आल्या. परंतु आता काही कॉलेज व शाळांच्या परिसरात अल्पवयीन मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे चाललेले असल्यामुळे त्यांच्यावर कायद्यानेच धाक बसू शकतो हे बारामती शहर पोलिसांनी ओळखले आहे. व बारामतीत कोणताही भावी गुंड तयार होऊ नये व त्यांचेकडून मोठा गुन्हा होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. सूरज मोरे व अभिषेक मोकाशी यांना अटक करण्यात आलेली आहे .तथाकथित बाबा मदने याचा शोध सुरू आहे. यातील फिर्यादी हा अल्पवयीन मुलगा असल्याने. त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवून त्याला सुद्धा योग्य समज देऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. यापुढे कॉलेज शाळा यांच्या आवारात मुलांची रोड रोमियो वगैरे दिसून आल्यास पोलीस त्यांच्यावर पुढे ते भावी गुन्हेगार बनू  नये म्हणून कठोर कारवाई करणार आहेत. याठिकाणी कॉलेजमधील विद्यार्थी शाळेतील मुली यांनी त्यांना असा जर कोणाचा त्रास होत असेल तर त्यांनी बिनदिक्कतपणे पोलिस ठाण्याशी संपर्क करावा तसेच बारामती विभागांमध्ये निर्भया पथक सुद्धा स्थापन करण्यात आलेले आहे तेसुद्धा कॉलेजेस शाळा या ठिकाणी सतत गस्त करत असते त्यांना सुद्धा आपण संपर्क करू शकता. कोणत्याही मुलीने त्यांना जर कोणी त्रास देत असेल तर तो सहन करू नये. थेट पोलिसांशी संपर्क साधावा त्यांना सांगण्यास संकोच वाटत असेल तर महिला पोलिसांची संपर्क करावा पोलीस ठाणे परिसरामध्ये कायम कर्तव्य साठी महिला अधिकारी कर्मचारी नेमणूक करण्यात आलेली आहे.सादर गुन्हा तपास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांचे सुचणे प्रमाणे पोलीस हवालदार मोरे करत आहेत.

No comments:

Post a Comment