दुर्दैवी घटना..उसाच्या ट्रॉलीखाली अडकून सख्खा दोन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू .! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 5, 2022

दुर्दैवी घटना..उसाच्या ट्रॉलीखाली अडकून सख्खा दोन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू .!

दुर्दैवी घटना..उसाच्या ट्रॉलीखाली अडकून सख्खा दोन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू .!                                                                              निरगुडसर : प्रतिनिधी ( प्रा.अरुण गोरडे)-दिः०५/०१/२०२२.- उसाच्या ट्रॉलीखाली अडकून सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने जेसीबी मशीन मागवून त्यांना उसाच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले.उसाने  भरलेली ट्रॅक्टर  ट्रॉली रस्त्यालगतच्या खड्ड्यात उलटली. त्या ट्रॉलीखाली अडकून ऊस तोडणीचे काम करणाऱ्या नगर जिल्ह्यातील दोन सख्खा बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात  आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी गावच्या  श्री गण्या डोंगर खिंडीत  (हद्दीत) घडला आहे.जिजाबाई पंढरीनाथ दुधवडे (वय ५०, रा. घारगाव ता. संगमनेर) आणि भीमाबाई यादव गांडाळ (वय ५२, रा .पळशी, वनकुटे ता. पारनेर) अशी उसाच्या ट्रॉलीखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्या सख्ख्या बहिणींची नावे आहेत. सध्या या दोन्ही बहिणी आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे राहत होत्या.निरगुडसर येथील महादू संभू वळसे यांच्या शेतातील उसाची तोडणी करून तो ट्रॅक्टरला (एमएच १६, सीव्ही ३५१४) जोडलेल्या दोन टायर गाडीमध्ये भरून कारखान्याकडे नेण्यात येत होता. त्या दोन टायर गाडीपैकी एका गाडीतील उसावर जिजाबाई पंढरीनाथ दुधवडे आणि भीमाबाई यादव गांडाळ या दोघी बहिणी बसल्या होत्या.उसाने भरलेला ट्रॅक्टर अवसरी बुद्रूक-पारगाव रस्त्यावरून मेंगडेवाडीच्या दिशेने निघालेला होता. मुक्ताबाई खिंडीच्या पुढे गेल्यानंतर असलेल्या उतारावर ट्रॅक्टर आणि एक ट्रॉली रस्त्याच्या कडेला उलटली. त्यातील एका ट्रॉलीवर बसलेल्या दोघी बहिणी खाली कोसळल्या. त्यांच्या अंगावर ट्रॉलीतील ऊस पडून त्या टायरगाडीखाली दबल्या गेल्या. या अपघतात त्यांना गंभीर जखमा झाल्या होत्या.
परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने जेसीबी मशीन मागवून त्यांना उसाच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना संदीप घुले यांच्या रुग्णवाहिकेतून मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी तातडीने रवाना करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, अशी माहिती मंचर पोलिसांनी दिली. पोलिसांनी ट्रॅक्‍टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मंचर पोलिस करीत आहेत.

No comments:

Post a Comment