अखेर आठ जागांसाठी अकरा ऊमेदवारांनी अर्ज केले दाखल.माघारी नंतर होणार चित्र स्पष्ट.
लोणी-धामणी :प्रतिनिधी (कैलास गायकवाड)-दिः०५/०२/२०२२. आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्टया महत्वाच्या असणार्या धामणी (ता. आंबेगाव ) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूकी साठी एकूण तेरा जागा असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वसाधरण आठ जागांसाठी अकरा ऊमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.तर पाच जागा बिनविरोध निवडणून आल्या आहेत.अशी माहिती निवडणूक अधिकारी एस.पी.बोराडे यांनी कळविली आहे. अनुसुचीत जाती-जमाती एक,सर्वसाधारण महिला प्रतिनिधी दोन,इतर मागासवर्गीय एक, भटक्या विभक्त जाती-जमाती एक अशा पाच जागांसाठी पाचच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.त्यामळे या पाच जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.तर उर्वरीत आठ जागांसाठी अकरा ऊमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. अतिशय अटीतटीची समजली जाणारी या सोसायटीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी येथील महविकास आघाडिच्या नेत्यांनी सर्व पक्षीय बैठक घेऊन तेरा जागांसाठी तेरा ऊमेदवार निश्चित केले होते.पण इतर जागा सोडता सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी या आठ जागांसाठी शेवटच्या दिवशी अकरा ऊमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत अठरा फेब्रुवारी आहे.जर अकरा पैकी तिघांनी माघार घेतली नाही तर निवडणूक होणारच अशी प्राथमिक माहिती समजली आहे. मोठा गाजावाजा करून निवडणूक बिनविरोद्ध झाल्याचे महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी जाहिर केले होते.पण खरंच निवडणूक बिनविरोध होणार की ? निवडणूक लागणार ? हे अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीच समजेल हे मात्र नक्की ? मात्र तोपर्यंत पारावराच्या व चौका चौकातील गप्पा या रंगणारच हे तितकेच खरे आहे.
No comments:
Post a Comment