बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅड.बी.डी.कोकरे विजयी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 5, 2022

बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅड.बी.डी.कोकरे विजयी..

बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅड.बी.डी.कोकरे विजयी..             बारामती:-बारामतीत वकील संघटनेची नुकताच निवडणूक पार पडली यामध्ये बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅड.बी.डी.कोकरे यांनी 147 मतांनी विजय संपादन केला तर उपाध्यक्षपदी अँड. अजित शेरकर व अॅड. राजकिरण शिंदे यांनी विजय
मिळवला.बारामती वकील संघटनेची सन २०२२-२३ करिता निवडणूक प्रक्रिया आज
खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
अध्यक्षपदासाठी अॅड. बी.डी कोकरे, अॅड.
विशाल विजय बर्गे व अॅड. अविनाश
गायकवाड रिंगणात होते. अॅड. बि.डी
कोकरे यांनी 147 मतांनी विजय मिळविला.
त्यांना 356 मते मिळाली तर अॅड. विशाल
बर्गे यांना 209 मते मिळाली.उपाध्यक्षपदासाठी अजित शेरकर, राजकिरण शिंदे, प्रसाद पवार व अमृत नेटके हे चार उमेदवार रिंगणात होते. अजित शेरकर यांनी 435 मते मिळवून विजय प्राप्त केला. सचिवपदी संदीप सुरेश पाटील यांची
बिनविरोध निवड करण्यात आली.सहसचिव पदासाठी सोहेल शेख व मंगेश लोंढे यांच्यात लढत झाली. त्यामध्ये 404 मते मिळवून सोहेल शेख विजयी ठरले.खजिनदारपदी ऋषिकेश निलाखे, ग्रंथपालपदी अॅड.प्रीतम क्षीरसागर तर महिला प्रतिनिधी म्हणून अॅड. उषा गावडे यांची
बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय
अधिकारी म्हणून अॅड. विजय तावरे, डी टी.
शिपकुले, ज्ञानदेव रासकर, आर डी काळे,
संजय टकले, नितीन अवचट प्रवीण कांबळे
यांनी काम पाहिले.तर नूतन पदाधिकारी यांचे सर्वांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment