*निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृती शिल्पाचे लोकार्पण* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 20, 2022

*निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृती शिल्पाचे लोकार्पण*

*निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृती शिल्पाचे लोकार्पण*

बारामती (प्रतिनिधी) - नवी मुंबई येथील ऐरोली परिसरातील पटनी जंक्शन येथे परम पूज्य निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे स्मृती शिल्प उभारण्यात आले असून काल नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या शिल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
परम पूज्य निरंकारी बाबा स्वर्गीय हरदेवससिंहजी महाराज यांनी कायमच सत्य, प्रेम आणि एकात्मता बाळगण्याचा मौलिक सल्ला दिला. मानवाला मानव प्रिय असावा,एकमेकांना एकमेकांचा आधार व्हावा हा संदेश शिरसावंद्य मानून त्यांचे अनुयायी समाजासाठी कायम
सेवभावनेने कार्य करत असतात. महाड चिपळूण येथे आलेल्या महापूराच्या प्रसंगी देखील मला या सेवाभावी वृत्तीचा परिचय आला होता. असे शिल्पाच्या लोकार्पण समयी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सागितले. त्यांची हीच शिकवण समाजात रुजावी, वाढावी यासाठी हे स्मृती शिल्प तयार करण्यात आले असल्याचे यासमयी
पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी खासदार राजन विचारे, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले,माजी नगरसेवक एम.के. मढवी, माजी नगरसेवक करण
मढवी, माजी नगरसेवक नवीन गवते, माजी नगरसेवक शैलेश हळदणकर आणि नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी तसेच संत निरंकार संप्रदायातील बंधू भगिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment