बारामती शहर पोलिसांचा शहरातील मटका जुगार अड्ड्यावर छापा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 7, 2022

बारामती शहर पोलिसांचा शहरातील मटका जुगार अड्ड्यावर छापा...

बारामती शहर पोलिसांचा शहरातील मटका जुगार अड्ड्यावर छापा...
बारामती:- उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती यांनी शहर पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर छापेमारी केली नंतर बारामती शहर पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाईची मोहीम तीव्र केलेली आहे. सर्व बीट अंमलदार यांना कारवाई करण्याचे सक्त  आदेश दिलेले आहे तसेच फक्त अवैध धंद्याची माहिती काढण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. आज सकाळी सव्वा अकरा वाजेच्या दरम्यान पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना माहिती मिळाली की पान गल्ली येथे अभि शिंदे च्या घराजवळ इसम नामे शेखर भारत सोनवणे, या मटका बुकी च्या जवळ शहरांमध्ये फिरून कल्याण नावाचा मटका जुगार घेणारे मोहन कुबेर चंद शहा ,महेश प्रल्हाद राऊत ,काळूराम मुरलीधर जाधव, शंकर मारुती हातगे, राजेंद्र बाळासाहेब कोरडे हे आले असून शहरांमध्ये फिरून हे लोकांकडून कल्याण मटका नावाचा जुगार पैशाची देवाण-घेवाण करून त्यांना मटक्याची पावती देत आहेत अशी माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे सहाय्यक पोलीस फौजदार संजय जगदाळे सातपुते हवलदारअजित राऊत दशरथ इंगोले, अभी कांबळे, कोठे, दळवी, देवकर यांचे विशेष पथक त्या ठिकाणी पाठवून सर्वांना जागेस ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे बॉलपेन कल्याण मटक्याच्या कार्बन दुयम चिठ्ठ्या   रोख पस्तीस शे रुपये व बारा हजार रुपयाचा हँडसेट बॉल पेन मटका चिट्ठी कार्बन कॉपी असा 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल मिळाला सदर चा मटका मोबाईलवर पुढे मयूर कांबळे या मटका बुक किस फिरवत असलेची आरोपीने सांगितले .वरील सर्वांना पोलिस ठाण्यात आणून जुगार प्रतिबंधक अधिनियम कलमाप्रमाणे कारवाई करण्यात आली.

No comments:

Post a Comment