अवैध दारू वाहतूक करणारी चार चाकी जप्त
बारामती:- काल सायंकाळी रात्री नऊच्या दरम्यान बारामती शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाच्या रेनॉल्ट क्युट गाडी क्रमांक MH 42 AX42 63 मधून देशी दारूचे बॉक्स व इंग्लिश दारूच्या काही कॉर्टर ग्रामीण भागांमध्ये विक्रीसाठी घेऊन चाललेले आहेत अशी माहिती मिळताच सदरची गाडी गुणवडी चौक बारामती या ठिकाणी अडवण्यात आली सदर गाडीची झडती घेतली असता सदर गाडीमध्ये देशी दारुची सिमला ब्रँडचा एक बॉक्स व टॅंगो कंपनीच्या ब्रँडचा 180 ईमेलचा एक बॉक्स इंग्लिश दारूच्या 180 बॉक्स कंपनीच्या चार बोटल असा 13200 रुपयाचा दारू साठा मिळून आला सदरची कार किंमत अंदाजे पाच लाख रुपये हे सुद्धा जप्त करण्यात आली अशा रितीने एकूण पाच लाख 64 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व इसम नामे सागर भगवान भोसले वय 29 राहणार निरावागज यांना ताब्यात घेण्यात आले सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर ढाकणे पोलीस अंमलदार, तुषार चव्हाण, खांडेकर , दशरथ कोळेकर ,कोठे, दशरथ इंगोले, राऊत ,अतुल जाधव संजय जाधव ,यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment