खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेनुसार, सोलापूर डिव्हिजनला रेल्वे मॅनेजर शैलेश गुप्ता यांची भेट.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 16, 2022

खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेनुसार, सोलापूर डिव्हिजनला रेल्वे मॅनेजर शैलेश गुप्ता यांची भेट..

सोलापूूर:- बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेनुसार, आज सोलापूर डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर शैलेश गुप्ता यांची, आज सोलापूर येथे भेट घेतली आणि दौंड शहरातील कुरकुंभ मोरीचे काम गेली आठ वर्षापासून प्रलंबित आहे, ते काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली, मागील आठवड्यात दौंड येथे पत्रकारांशी आणि नागरिकांशी संवाद साधत असताना कुरकुंभ मोरीच्या प्रलंबित असणाऱ्या कामाविषयी तातडीची बैठक सोलापूर येथे घेण्याचे ठरले होते, आज डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांना प्रत्यक्ष भेटून दिनांक ०१/०३/२०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रेल रोको आंदोलनाचे पत्र दिले, व कुरकुंभ मोरीच्या कामासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली, यावेळी सेंट्रल रेल्वेचे सदस्य व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रविण शिंदे,दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार,पुणे जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान,शहराध्यक्ष गुरुमुख नारंग,पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन काळभोर,संजय गांधी निराधार योजनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष सागर मिसाळ उपस्थित होते...

No comments:

Post a Comment