अवसरी बु ते निरगुडसर मार्गे भीमाशंकर साखर कारखाना, शिरुर येथे जाण्यासाठी सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष यांच्या मागणीनुसार साकव कार्यक्रम अंतर्गत येथे साकव पूल मंजूर झाला असल्याचे तसेच गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून विविध विकास कामांना निधीची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता होत असून कामे दर्जेदार करावीत, असे विष्णूकाका हिंगे यांनी सांगितले.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद वळसे पाटील, सरपंच उर्मिला वळसे पाटील, उपसरपंच आनंदराव वळसे, रामचंद्र वळसे, माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील, दादाभाऊ टाव्हरे, सुरेश आवारी, संतोष वळसे पाटील, संभाजी वळसे, भाऊसाहेब सुडके, माऊली टाव्हरे, बाळासाहेब वळसे, विक्रम वळसे, भाऊसाहेब वळसे, संजय वळसे, व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment