मुंबई येथे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देताना महासंघाचे पदाधिकारी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 16, 2022

मुंबई येथे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देताना महासंघाचे पदाधिकारी..

मुंबई येथे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देताना महासंघाचे पदाधिकारी..             निरगुडसर : प्रतिनिधी( प्रतिक अरुण गोरडे.):- दि:१६/०३/२०२२. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने मंगळवार ( दिः१५) रोजी आझाद मैदान मुंबई येथे शिक्षकांच्या समस्या निराकरणासाठी धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये राज्यातील विविध भागातून सुमारे पाचशे शिक्षक उपस्थित सहभागी झाले होते.धरणे आंदोलनाच्या वेळी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महासंघ पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी त्यांच्या बंगल्यावर निमंत्रित केले.या बैठकीमध्ये शिक्षण मंत्री व आमदार डॉ.सुधीर तांबे,आमदार विक्रम काळे,आमदार जयंत आजगावकर,आमदार अभिजित वंजारी,आमदार बाळाराम पाटील हे सहभागी झाले होते.यावेळी महासंघ पदाधिकाऱ्यांमध्ये महासंघाचे अध्यक्ष डॉ.संजय शिंदे समन्वयक प्रा.मुकुंद आंधळकर,सरचिटणीस प्रा.संतोष फाजगे, उपाध्यक्ष प्रा.अविनाश तळेकर,उपाध्यक्ष प्रा.सुनील पूर्णपात्रे, जिल्हा सरचिटणीस प्रा.लक्ष्मण रोडे हे उपस्थित होते.सदर प्रसंगी चर्चेमध्ये शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी वाढीव पदांना आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली जाईल असे सांगितले.त्याचप्रमाणे आयटी विषयास अनुदानित करण्यासाठी लवकरच माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल.असे स्पष्ट केले व वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी साठीचे प्रशिक्षण आठवड्याभरात सुरू केले जाईल असे सांगितले.उर्वरित मागण्यांसाठी सोमवार (दि:२१) रोजी महासंघाशी अधिकृतपणे बैठकीचे आयोजन करून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे सविस्तर चर्चा करून अनुकूल निर्णय घेतले जातील असे स्पष्ट केले.महासंघा तर्फे डॉ.संजय शिंदे यांनी या चर्चेबद्दल समाधान व्यक्त केले व सोमवारी उर्वरित मागण्यांबाबत अनुकूल निर्णय घेतले जातील असा आशावाद प्रकट केला.यानंतर महासंघाने आपले धरणे आंदोलन स्थगित केले मागण्याची पूर्तता न झाल्यास आवश्यकतेनुसार पुनश्च आंदोलन केले जाईल असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment