चक्क..शेतकऱ्यांनी केली अफूच्या झाडाची लागवड..
लोणी धामणी- (प्रतिनिधी - कैलास गायकवाड):- दि.१५/३/२०२२ मौजे नांदूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. नांदूर गावच्या हद्दीत सयाजी महादेव वाळुंज त्यांच्या नावे असलेल्या शेतात त्यांचा मुलगा राजेंद्र सयाजी वाळुंज यांचे जमीन गट नंबर 3४/34 मधील कांद्याच्या शेतात आंतरपीक म्हणून घेतलेली अफूची झाडे , विक्री करण्याच्या उद्देशाने ५२५ अफूची ओली झाडे आढळून आली. त्यातील वीस झाडांना लहान-मोठी बोंडे असून, चार झाडांना पांढऱ्या रंगाची फुले आहेत. सदर झाडांचे वजन ९.३००कि. ग्रॅम. प्रति किलो ५,५००/रु. प्रमाणे ५१.१५०हजार रुपये किंमतीची लागवड केलेली झाडे आढळून आली. म्हणून राजेंद्र सयाजी वाळुंज वय वर्ष ५४ राहणार नांदूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. त्यांच्या विरोधात गुंगीकारक औषधी द्रव्य मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम(एन. डी.पी. एस.)सन १९८५चे कलम ८,१५,१८,३२,४६ अन्वये सरकार तर्फे कायदेशीर फिर्याद योगेश परशुराम रोडे पोलीस कॉन्स्टेबल मंचर पोलीस स्टेशन यांनी,दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर आर,बी बांबळे करत आहे.
No comments:
Post a Comment