झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी भीमसेन सर्जेराव उबाळे यांची सर्वानुमते निवड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 15, 2022

झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी भीमसेन सर्जेराव उबाळे यांची सर्वानुमते निवड..

झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी भीमसेन सर्जेराव उबाळे यांची सर्वानुमते निवड..
पुणे:- झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील भीमसेन सर्जेराव उबाळे यांची शनिवारी पुणे शासकीय विश्रामगृह येथे झोपडपट्टी सुरक्षादलाचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.सामाजिक कार्याची व सामजिक चळवळीतील आवड असणाऱ्या भिमसेन उबाळे यांच्या कामाची दखल घेत संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट साहेब यांनी पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून भीमसेन उबाळे सर यांची निवड केली. यावेळी संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष  मोहम्मद शेख, दत्ता कांबळे, हरिभाऊ वाघमारे, काशिनाथ गायकवाड, सुरेश धिवार, मुकुंद शिवशरण, सुरेखा भालेराव, पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर,  इंदापूर तालुका अध्यक्ष महेश पवार यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी भगवानराव वैराट यांनी संधी दिली असून या पदाच्या माध्यमातून मी प्रत्येक जाती-धर्मातील शोषित, पीडित, वंचित, भूमिहीन झोपडी धारकांना आणि कष्टकरी कामगारांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित पुणे जिल्हा उपाध्यक्ष भीमसेन सर्जेराव सर यांनी सांगितले.या निवडी प्रसंगी त्यांची समाजातील प्रत्येक स्तरातून कौतुक होवून शुभेच्छांचा वर्षाव होत व सत्कार केला जात आहे.

No comments:

Post a Comment