जिल्हा परिषद शाळा लोणी येथे बाल वाचनालय सुरू..
लोणी धामणी-( प्रतिनिधी - कैलास गायकवाड):- ता.१८/3/२०२२ लोणी तालुका आंबेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये,बुक वाला संस्था अमेरिका यांच्या माध्यमातून हे वाचनालय सुरू करण्यात आले लहान वयामध्ये मुलांना वाचनाची आवड तयार व्हावी डिजिटल युगामध्ये वाचन संस्कृती लोप पावत चालली असून मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने व पुस्तके वाचून ज्ञानात भर पडावी, म्हणून समितीच्या वतीने हे वाचनालय सुरू करण्यात आले असे रवींद्र वायाळ यांनी सांगितले,यावेळी संस्थेचे पुणे विभागाचे अध्यक्ष कुणाल पवार, आयआरबी कंपनीचे जनरल मॅनेजर रवींद्र वायाळ, प्रियंका चांडक, आकांक्षा मॅडम, माजी प्राचार्य वसंत वाळुंज शालेय समितीचे अध्यक्ष बाळशीराम वाळुंज उपाध्यक्ष गीतांजली लंके, नितीन आढाव सागर गायकवाड, अनिल खोमणे, पल्लवी गायकवाड, माया जंगम, शिल्पा आदक, शिक्षक सुरेश भागवत बनकर मॅडम अमोल गायकवाड इत्यादी ग्रामस्थ हजर होते. सूत्रसंचालन सुरेश ढोबळे सर यांनी केले.
No comments:
Post a Comment