*निरंकारी बाबा गुरबचन सिंह मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटचा शुभारंभ..संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 19, 2022

*निरंकारी बाबा गुरबचन सिंह मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटचा शुभारंभ..संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा*

*निरंकारी बाबा गुरबचन सिंह मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटचा शुभारंभ..संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा*
                                                              
    बारामती (प्रतिनिधी) : सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने २२व्या निरंकारी बाबा गुरबचनसिंह मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटचा शुभारंभ, संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा येथील विशाल मैदानावर दिनांक १९  मार्च, २२ रोजी दुपारी १ वाजता करण्यात आला.
ही टुर्नामेंट १९ मार्च ते १६ एप्रिल, २२ या कालावधीत होणार आहे. या क्रिकेट स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी देशातील जवळ जवळ सर्वच राज्यांमधील युवकांनी नाव नोंदणी  केलेली असून त्यामधून एकंदर ४८ टीमची निवड करण्यात आलेली आहे. क्रिकेट टुर्नामेंटमध्ये भाग घेणारे सर्व खेळाडु कोविड-19 च्या संदर्भात सरकारकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक नियमांचे यथायोग्य पालन करतील. 
    या क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने करण्यात येत असून त्याबाबतचे संपूर्ण मार्गदर्शन व निर्देशन श्री जोगिन्दर सुखीजाजी, सचिव, संत निरंकारी मंडळ यांच्याकडून केले जात आहे. 
    या क्रिकेट टुर्नामेंटचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे प्रधान आदरणीय श्री सी.एल.गुलाटीजी आणि आदरणीय श्री आर.के.कपूरजी, चेअरमन, केन्द्रीय योजना व सल्लागार बोर्ड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी संत निरंकारी मंडळाचे पदाधिकारी, केन्द्रीय योजना व सल्लागार बोर्डाचे सदस्य, कार्यकारिणी समितीचे सदस्य आणि सेवादलचे अधिकारीगण उपस्थित होते. 
      या क्रिकेट टुर्नामेंटची सुरवात बाबा हरदेवसिंहजी यांनी बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ केली होती. बाबाजींनी सदैव युवकांच्या ऊर्जेला नवे परिमाण देण्यासाठी त्यांना नेहमी खेळांच्या प्रति प्रेरित व प्रोत्साहित केले ज्यायोगे त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा मिळेल आणि ते देश व समाजाच्या सुंदर व समुचित विकासासाठी योगदान देऊ शकतील. 
   सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजदेखील वेळोवेळी नवी ऊर्जा व उत्साहाने विविध खेळांच्या स्पर्धा इत्यादि आयोजित करुन युवकांना निरंतर प्रोत्साहित करत आहेत. त्यामध्ये निरंकारी युथ सिम्पोझियम (NYS) निरंकारी सेवादल सिम्पोझियम (NSS) यांसारख्या eventsचा सद्गुरु माताजी नेहमीच शारीरिक व्यायाम व खेळांसाठी प्रोत्साहनावर भर देत आहेत जेणेकरुन आपण यातून आपल्या जीवनात प्रेरणा प्राप्त करु शकू. माताजींचे कथन आहे, की आपण आत्मिक रूपात स्वस्थ असतानाच शारीरिक व मानसिकदृष्टीनेही स्वस्थ असणे आवश्यक आहे. 
    या टुर्नामेंटमध्ये भाग घेणारे खेळाडु आणि त्यांचे सहयोगी यांच्यासाठी कोविड-19 चे निर्देश लक्षात घेऊन चिकित्सा सुविधा, जलपान, प्याऊ, सुरक्षा व पार्किंग इत्यादिची उचित व्यवस्था करण्यात आली आहे.  
    मानव एकतेचा संदेश देणाऱ्या या क्रिकेट टुर्नामेंटचा उद्देश विभिन्न संस्कृती व वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या सर्व खेळाडुंमध्ये प्रेम, एकत्व आणि बंधुभावाच्या भावनेबरोबरच मानव एकता स्थापन करणे हा आहे.  ज्यायोगे आध्यात्मिक ज्ञानामध्ये निहित असलेले अनेकतेत एकतेचे सुसंदर परिदृश्य प्रस्तुत होऊ शकेल.

No comments:

Post a Comment