पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे व्यक्त केले आभार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 20, 2022

पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे व्यक्त केले आभार..

पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे व्यक्त केले आभार..

 लोणी धामणी - (प्रतिनिधी- पियुष गायकवाड ):-  ता.२०/३/२०२२ पारगाव तालुका आंबेगाव. येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव तालुका आंबेगाव येथील विश्रामगृहावर,महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन मानले आभार.गृहमंत्र्यांच्या प्रयत्नाने २० दिवस किरकोळ रजा व पोलीस शिपायाचे अधिकाऱरी होण्याचे स्वप्न साकार केल्याबद्दल, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, मंचर पोलिस स्टेशनचे अधिकारी, सतीश होडगर शिपाई   सर्वांनी मिळून पोलीस खात्याला सुविधा मिळवून दिल्याबद्दल सर्वांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. यावेळी   पोलीस कर्मचारी गणेश साळुंके, प्रशांत भोईर, जाधव मेजर,राकेश नलावडे, संतोष जाधव, श्रीकृष्ण पोरे,वैभव सावंत व इतर मान्यवर हजर होते.

No comments:

Post a Comment