लोणीत शिवशंभो शेतकरी सहकारी पॅनलचे वर्चस्व... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 1, 2022

लोणीत शिवशंभो शेतकरी सहकारी पॅनलचे वर्चस्व...

लोणीत शिवशंभो शेतकरी सहकारी पॅनलचे वर्चस्व...

लोणी धामणी -(प्रतिनिधी - कैलास गायकवाड)दि.३१/४/२०२२ लोणी तालुका आंबेगाव श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्था लोणी.२०२२-२०२७ संचालक मंडळाची निवडणूक पार पडली या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरस्कृत श्री शिव शंभो शेतकरी सहकारी पॅनलने आठ जागा जिंकून बाजी मारली. शिवसेना पुरस्कृत  श्री शिवशंभो विकास परिवर्तन पॅनेल ला पाच जागा मिळाल्या. शिवशंभो शेतकरी सहकारी पॅनलचे नेतृत्व ज्येष्ठ नेते बाळासाहेब वाळूंज, आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया चे अध्यक्ष भगवान शेठ सिनलकर, सरपंच उर्मिला ताई धुमाळ, शरद सहकारी बँकेचे संचालक अशोकराव पाटील, महेंद्र शेठ वाळुंज, वाळुंज नगर चे सरपंच विजय सिनलकर, माजी सरपंच उद्धवराव लंके, बाळशी राम वाळुंज , पांडुरंग दिवटे. धोंडीभाऊ वाळुंज माजी सरपंचयांनी केले.  शिवशंभो सहकारी परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व माजी सरपंच दिलीप शेठ वाळुंज,माजी सरपंच साळवे राम नाईक यांनी केले. शिवशंभो शेतकरी सहकारी पॅनल चे  विजयी उमेदवार शरद शेठ वाळुंज, उत्तम श्रीपती आदक, दिलीप आदक, किसन वाळुंज, रुक्मिणी ताई वाळुंज, बबन वाळुंज, सतीश थोरात.राजेश तुकाराम सोनवणे. शिवशंभो सहकारी परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे दीपक वाळुंज, तानाजी वाळुंज, राजेंद्र गायकवाड,ज्योती जगन्नाथ लंके, खंडू भिवा माकरे.हे उमेदवार विजयी झाले निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक दादा  वळसे पाटील यांनी  राष्ट्रवादीच्या  विजयी उमेदवारांचा सत्कार केला.

No comments:

Post a Comment