वालचंदनगर :- कर्तव्यनिष्ठ उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती विभाग बारामती मा.गणेश इंगळे यांच्या उपस्थितीत ॲट्रॉसिटी कायदा , बाललैंगिक अत्याचार कायदा , महिलाचे घरगुती अत्याचारापासून संरक्षण कायदा व भारतीय पुरावा कायदा , सिनियर सिटिझन ॲक्ट अशा विविध विषयांवरती वैभव तानाजी धाईंजे युवा सामाजिक कार्यकर्ते इंदापूर तालुका यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची रूपरेषा उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती विभाग बारामती मा.गणेश इंगळे साहेब व सहायक पोलीस निरीक्षक वालचंदनगर मा. बिराप्पा लातूरे व वैभव धाईंजे यांनी आखून कार्यक्रम खूप छान पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव धाईंजे यांनी करून लोकांना या कायद्याविषयी गुन्हे दाखल करताना येणाऱ्या अडचणी यांवर उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती यांनी स्वतः त्या अडचणीचे निरसन करत , कार्यकर्त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती यांनी दिली. व शेवटी कार्यक्रम संपला असं जाहीर करत वैभव धाईंजे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी व सहाय्यक पोलिस निरीक्षक वालचंदनगर , गोपनीय विभागाचे विनोद पवार , अमर थोरात साहेब यांचे आभार मानले. व कार्यक्रमात मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल मा.उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती मा.गणेश इंगळे साहेब व वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा. बिराप्पा लातूरे यांचे पुष्प गुच्छ देऊन सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले.अशाच प्रकारचे पोलिसांना सहकार्य वालचंदनगर मधील सामाजिक कार्यकर्ते करतील अशी अपेक्षा उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी व्यक्त केली.
पोलिस स्टेशन अंतर्गत सामाजिक कार्यकर्त्यांची ॲट्रॉसिटी आणि इतर कायद्याविषयी मीटिंग उत्साहात संपन्न : वैभव धाईंजे
No comments:
Post a Comment