पुण्यस्मरणा निमित्त गावात केले वृक्षारोपण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 21, 2022

पुण्यस्मरणा निमित्त गावात केले वृक्षारोपण..

पुण्यस्मरणा निमित्त गावात केले वृक्षारोपण..
------------------------------------------------------
 लोणी धामणी प्रतिनिधी  पियुष गायकवाड :-ता.२१/५/२०२२ लोणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील सुप्रसिद्ध व्यवसायिक लक्ष्मण भाऊ शेठ लोळगे (अण्णा )यांचे गेल्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. उद्या त्यांचे प्रथम पुण्यस्मरण त्यांच्या मुलांनी व नातवांनी त्यांची आठवण म्हणुन लोणी गावातील परिसरात वृक्षरोपणचा निर्णय घेतला. संपूर्ण परिवार व्यवसायानिमित्त बाहेरगावी असततो , परंतु आपण आपल्या गावाचं काही देणं लागतो ह्या भावनेने त्यांनी विविध कार्यक्रमाचे नियोजन केले .स्मशानभूमी आणि शाळेचा परिसरात लोळगे परिवारानेअमोल कैलास लोळगे, मच्छिंद्र लोळगे, व नातू राजेंद्र लोळगे व सामाजिक कार्यकर्ते सुधीर लोळगे यांनी सामाजिक जाण ठेवून वृक्षरोपण वर्षभर संगोपन करण्याचा चा निर्णय घेतला. लोळगे परिवाराचा गावाच्या विकासकामात मोठा सहभाग असतो.  अग्रेसर ग्रुप चे सुधीर लोळगे हे वर्षभर गावामध्ये विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवित असतात.याप्रसंगी शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश वाळुंज, जिल्हा परिषद गटाचे सरचिटणीस बाळशीराम वाळुंज, उपसरपंच अनिल पंचरास, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत गायकवाड इत्यादी ग्रामस्थ हजर होते.

No comments:

Post a Comment