पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो आणि रुग्णवाहिकेची समोरासमोर धडक
-------------------------------------
कैलास गायकवाड
आंबेगाव(पुणे )तालुका प्रतिनिधी:-
एकलहरे तालुका आंबेगाव जि. पुणे येथे टेम्पो व रुग्णवाहिकेची समोरासमोर धडक.
सविस्तर वृत्त असे की १९/५/२०२२रोजी साडेदहा वाजता एकलहरे गावचे हदतीत हॉटेल आमंत्रण समोर टेम्पो ४०७नं. एम.एच.१५जी.९८५१ गोरख साहेबराव काळे २९ वर्ष धंदा ड्रायव्हर रा. नांदुर् लिंक रोड ओम साई निवास फ्लॅट क्रमांक ६ नाशिक, फिर्यादी .मंचर कडून नारायणगाव कडे जात होता. शिवाजी रघुनाथ खाडे वय २४ वर्ष भंडारदरा तालुका अकोले जिल्हा अहमदनगर.हा इको रुग्णवाहिका गाडी नं एम. एच.०३ए. एच.६५६०हा ओव्हरटेक करून भरधाव वेगातसमोरासमोर अपघात केला. रुग्णवाहिके मधील राजू मारुती डोके ३१वर्ष रा. केळी कोतुळ पिसे वाडी ता. अकोले जि. अहमदनगर हा पेशंट मंगल हॉस्पिटल अकोले इथून ससून हॉस्पिटल पुणे. इथे घेऊन जात असताना, त्याचे सोबत असणारे १ज्ञानदेव महादू पथवे रा. वय ३५रा. संगमनेरता. अहमदनगर,२ संतोष शिवाजी गडाख वय वर्ष ३५ताना तालुका अकोले जिल्हा अहमदनगर,३ माऊ जी मारुती डोके ४०वर्ष, ४ सुमन माऊजी डोके वय ३७वर्ष,५ आशाबाई राजू डोके वय २५वर्ष सर्व रा. केळी कोतुळ ता. अकोले जि. अहमदनगर. यांना किरकोळ व गंभीर दुखापतीस कारणीभूत होऊन, दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून त्याचावर गुन्हा दाखल झाला.
गुन्हा र नं २१७/२०२२भा द वी क २७९,337,33८,४२७मो वा का क १८४गुन्हा रजिस्टर दाखल करून पुढील तपास पोलीस नाईक हिले हे करत आहे.
No comments:
Post a Comment