बऱ्हाणपूर येथे अवैध मुरूम उत्खनन चालू तर पोलीस मुख्यालय जागेशेजारी अवैध दारू विक्री.!महसूल, पोलीस व आरटीओ चे दुर्लक्ष.!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 26, 2022

बऱ्हाणपूर येथे अवैध मुरूम उत्खनन चालू तर पोलीस मुख्यालय जागेशेजारी अवैध दारू विक्री.!महसूल, पोलीस व आरटीओ चे दुर्लक्ष.!!

बऱ्हाणपूर व उंडवडी येथे अवैध मुरूम उत्खनन चालू तर पोलीस मुख्यालय जागेशेजारी अवैध दारू विक्री.!महसूल, पोलीस व आरटीओ चे दुर्लक्ष.!!                                                                                        बारामती:-बारामती विकासाचे मॉडेल म्हटले जाते  आणि तशी कामेही चालू आहे उपमुख्यमंत्री अजितदादा याकडे लक्ष देऊन आहे पण अश्या कामाच्या नावाखाली अवैध मुरूम उत्खनन होत असल्याचे दिसत आहे, शासकीय कामासाठी मुरूम चालू आहे असे म्हणून काही लोक दुसरीकडे मुरूम विकतात याबाबत वारंवार अधिकारी वर्गाला कळविले,मंडलाधिकारी व तलाठी यांना सांगितले पण काय गौडबंगाल आहे हे समजत नाही आणि कारवाई ही होत नाही, उपमुख्यमंत्री अजितदादा अहोरात्र स्वतः लक्ष घालून विकासाच्या कामात चूक होऊ नये म्हणून प्रयत्न करीत असतात आणि इकडे मात्र काही महाशय  असा कामाचा दिखावा दाखवून अवैध मुरूम उत्खनन करतात व राजरोज पणे विशेषतः शनिवार व रविवारी वाहतूक करतात रॉयल्टी शंभर ब्रास ची घ्यायची आणि हजारो ब्रास मुरूम उत्खनन करायची त्यामुळे यांच्यावर कसलाही धाक उरला नाही तर दुसरीकडे अश्या उत्खनन होत असलेल्या काही ठिकाणी उदाहरण पोलीस मुख्यालय शेजारी रात्री सात नंंतर अवैध दारू विक्री चालू आहे असे समजते अश्या मुळे गुन्हेगारी वाढण्यास प्रोत्साहन मिळत आहे याकडे लक्ष देऊन कारवाई होईल का?हे पाहणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment