मूकबधिर शाळेच्या नावाने देणगी गोळा करणाऱ्या विरुद्ध तक्रार अर्ज दाखल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, June 13, 2022

मूकबधिर शाळेच्या नावाने देणगी गोळा करणाऱ्या विरुद्ध तक्रार अर्ज दाखल...

मूकबधिर शाळेच्या नावाने देणगी गोळा करणाऱ्या विरुद्ध तक्रार अर्ज दाखल...                           बारामती:- श्री. महेश ढवाण पोलिस निरिक्षक बारामती तालुका (ग्रामीण) यांना नुकताच अज्ञाताविरुद्ध तक्रार अर्ज देण्यात आला, मूकबधिर निवासी विद्यालय कऱ्हावागज ता. बारामती चे सौ. रामेश्वरी नितीन जाधव या शाळेची संस्थापक असून सध्या या शाळेत मुख्याध्यापक या पदावर काम करित आहे. ही शाळा बिना अनुदानित आहे,त्यामुळे पूर्णपणे सामाजिक योगदानावर चालते. अनेक दानशुर लोक त्यांचे वाढदिवस शाळेतील मुकबधिर मुलांसोबत साजरा करतात नंतर त्यांना शाळेच्या वतीने पावती व आभार पत्र दिले जाते पण समाजातील काही अल्पबुद्धी या पावत्याचा व आभार पत्राचा गैरवापर करून देणगी व किराणा वगैरे साहित्य जमा करित आहेत. आम्हाला बरेच फोन आल्यावर सगळे समजले पण आमचा कोणीच कर्मचारी गेल्या १७ वर्षात देणगी साठी कधीच मार्केट मध्ये फिरला नाही तरी विचार करता अशा अज्ञाताविरुद्ध या संस्थेच्या वतीने ह्या निवासी 35 विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी
तक्रार अर्ज देत आहे. ही त्यावर त्या अज्ञाताचा शोध घेऊन त्यावर योग्य ती यावी अशी लेखी अर्जाद्वारे निवेदन देण्यात आले.अशी कोणी व्यक्ती मूकबधिर निवासी विद्यालय च्या नावाने देणगी मागत असेल तर त्याची खातर जमा करावी संबंधित शाळेच्याच्या संस्थापक यांना कळवावे किंवा पोलीस स्टेशनमध्ये कळवावे असे आवाहन सौ.रामेश्वरी जाधव यांनी केले.

No comments:

Post a Comment