धक्कादायक.. पोलीस भरती मार्गदर्शनचा बहाणा करून पोलीस हवालदाराने केले चक्क नग्न होऊन व्हिडीओ कॉल..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, June 13, 2022

धक्कादायक.. पोलीस भरती मार्गदर्शनचा बहाणा करून पोलीस हवालदाराने केले चक्क नग्न होऊन व्हिडीओ कॉल..!

धक्कादायक.. पोलीस भरती मार्गदर्शनचा बहाणा करून पोलीस हवालदाराने केले चक्क नग्न होऊन व्हिडीओ कॉल..!                              पुणे:- ऐकावे ते नवलच सध्या महिला सुरक्षित नसल्याचे अनेक उदाहरणे मिळत आहे, तर यामध्ये प्रामुख्याने पोलीस खात्यातील पोलीस कर्मचारी असो अथवा पोलीस अधिकारी ह्याचेच प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे चांगले काम करणारे पोलीस खाते बदनाम होत आहे ,अशीच काहीशी घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील एका विवाहितेला पोलीस भरतीमध्ये मदत करण्याच्या उद्देशाने तिच्यासोबत अश्लील
चॅटिंग केली. तसेच व्हिडीओ कॉल करुन नग्न होऊन विक्षिप्त प्रश्न करणाऱ्या एका वाहतूक हवालदाराविरुद्ध  जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे
पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. गणेश बाळू जोरी असे या हवालदाराचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने थेट पोलीस अधीक्षक
डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधून जुन्नर पोलीस ठाण्यात धाव घेतली अन् वाहतूक पोलीस हवालदार गणेश जोरी यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. पीडित 29 वर्षीय विवाहित
महिलेने डीएड केले असून ती विविध ठिकाणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाचे काम करते. एका वृत्तपत्रामध्ये तिने पोलीस भरतीची जाहिरात
वाचली होती. 15 जूनला पोलीस भरती आहे
त्यासाठी तिला मदत हवी होती. यासाठी तिने
आपल्या आईकडून जुन्नर मधील काही पोलिसांचे नंबर घेतले होते. पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन करावे असे फोनद्वारे संपर्क करुन विचारले होते. मात्र, या दरम्यान 3 जून रोजी जुन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार गणेश जोरी याला पीडित महिलेने मोबाईलवर फोन करुन भरतीबाबत मार्गदर्शन करा, अशी विनंती केली. गणेश जोरी याने 6 जून रोजी रात्री बाराच्या सुमारास व्हॉट्सअॅप मेसेज करुन आणि फोन करुन पोलीस भरतीच्या शारीरिक तपासणीबाबत केली.बोलायला सुरुवात करीत यामध्ये त्याने पहिल्यांदा तुमचा फोटो पाठवा,तुमचे वजन किती ? उंची किती ? असे म्हणून तुम्ही तुमच्या मुलीला अंगावर दूध पाजता का ?तुमच्या **ची साईज काय आहे ? तुम्ही लूज ** वापरता का ? पोलीस प्रशिक्षणामध्ये रनिंग करावी लागते त्यामुळे
तुम्हाला टाईट ** घालावी लागेल. तुमच्या
पायाच्या मांड्या एकमेकांना घासतात का असे
अश्लील भाषेत बोलला. मात्र पोलीस भरतीसाठी तो एक शारिरीक चाचणीचा भाग असेल असे समजून पीडितेने त्याकडे दुर्लक्ष केले. 7 जून रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास पुन्हा
जोरी याने पीडित महिलेला व्हॉट्सअॅप कॉल
करुन वैयक्तिक माहिती विचारण्यास सुरुवात
केली.तेव्हा तुमचे आणि तुमच्या नवऱ्याचे पटत नाही का ? एकटेच राहता का ? तुमच्या नवऱ्याचे
बाहेर काही चालू आहे ? असेल तर ते कसे
ओळखायचे ? तुमचा नवरा *** करताना
तुमच्यावर तुटून पडतो का ? जर तो तुटून पडत
असेल तर त्याचे बाहेर अफेअर चालू असेल.
असे समजा आणि मला सांगा की रोज तुम्ही
किती वेळा *** करता.यावर पीडितेला लज्जा उत्पन्न झाली आणि तिने मुलगी रडत आहे असे सांगून फोन कट केला.मात्र, त्यानंतर अंगात कोणतेही कपडे न घालता व्हिडिओ कॉल केला. त्यावेळीही तो अशाच प्रकारे बोलू लागला.
तेव्हा पीडितेने फोन कट केला. रात्री बाराच्या
सुमारास पुन्हा व्हॉट्सअॅप कॉल केला आणि
पीडितेसोबत असेच अश्लील बोलू लागला.
तेव्हा पीडितीने पुन्हा फोन कट केला. त्यानंतर
त्याने मेसेज केला, त्या मेसेजला पीडित महिलेने
नॉर्मल रिप्लाय दिला.जोरी हा व्हिडीओ कॉल करताना त्याने त्याच्या अंगात कपडे घातलेले नव्हते, तो बोलताना त्याच्या छातीवर हाताने चोळत होता.हे पीडितेला खटकले आणि पीडितेने फोन कट केला.अखेर 8 जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा व्हॉट्सअॅप मेसेज करुन माफी मागितली आणि तुम्ही माझ्याशी बोला वगैरे मेसेज केले.या सर्व प्रकाराला कंटाळून पीडितेने थेट पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधून जुन्नर पोलीस ठाण्यात गणेश जोरी विरोधात तक्रार दिली.या प्रकारामुळे हादरलेल्या पीडितेने आरोपी हवालदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.अधिक तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment