श्री संत सावता माळी संघ, महाराष्ट्रराज्य च्या बारामती शहर अध्यक्षपदी अमित (बापू) आगम, तर उपाध्यक्षपदी संतोष नेवसे यांची निवड..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 19, 2022

श्री संत सावता माळी संघ, महाराष्ट्रराज्य च्या बारामती शहर अध्यक्षपदी अमित (बापू) आगम, तर उपाध्यक्षपदी संतोष नेवसे यांची निवड..!

श्री संत सावता माळी संघ, महाराष्ट्रराज्य च्या बारामती शहर अध्यक्षपदी अमित (बापू) आगम, तर उपाध्यक्षपदी संतोष नेवसे यांची निवड..!

बारामती:-श्री संत सावता माळी संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बंडोपंत कुंडलीक गोंधळे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व सचिव श्री   अरुण बबन भुकन यांनी बारामती येथील अमित (बापू) आगम, तर उपाध्यक्षपदी संतोष नेवसे यांची निवड केली आहे. समाजाच्या हिताच्या व राष्ट्रीय अस्मितेच्या प्रश्नांसोबत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व सामाजिक कार्यासाठी श्री संत सावतामाळी संघटनेच्या ध्येय धोरणानुसार कार्य करावे व महाराष्ट्रात संघटनेचा विस्तार करावा तसेच समाजसेवेचे कार्य करावे याकरिता आगम व नेवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

   अमित बापू आगम व संतोष नेवसे यांच्या पुढाकारातून  रक्तदान, वृक्षारोपण, गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप,मास्क वाटप, सार्वजनिक पाणपोई, आरोग्य शिबिर, विविध व्याख्यानांचे आयोजन केले जाते. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन श्री संत सावता माळी संघ महाराष्ट्रराज्य यांनी त्यांची नियुक्ती शहराध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर  केली आहे.
अमित आगम व संतोष नेवसे यांना  करिष्मा ताई बनकर जिल्हा महिलाअध्यक्षा,श्री संत सावता माळी संघ महाराष्ट्रराज्य यांच्या हस्ते नियुक्ती पत्र
देण्यात आले.
 यावेळी श्री संत सावता माळी संघ महाराष्ट्रराज्य चे पदाधिकारी अरूण भुकन, बंडोपंत गोंधळे,ऍड संग्राम बधे दादासाहेब जगताप, अमोल गोंधळे, सुनिता शेवकरी ,अरुण कोकण बंडोपंत गोंधळे संजय झुरुंगे  समीर टिळेकर, विद्याताई  ससाणे 
उपस्थित होते.

No comments:

Post a Comment