प्रा. माधव (एम. डब्ल्यू) जोशी सर म्हणजे सर्व सामान्य शिक्षकांना हवंहवंसं वाटणारा अखंड ऊर्जा प्रेरणा स्त्रोतः - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, June 10, 2022

प्रा. माधव (एम. डब्ल्यू) जोशी सर म्हणजे सर्व सामान्य शिक्षकांना हवंहवंसं वाटणारा अखंड ऊर्जा प्रेरणा स्त्रोतः

प्रा. माधव (एम. डब्ल्यू) जोशी सर म्हणजे सर्व सामान्य शिक्षकांना हवंहवंसं वाटणारा अखंड ऊर्जा प्रेरणा स्त्रोतः
बारामती:- अवकाश संशोधनाचा व्यासंग जपण्यासाठी सतत अग्रभागी असणारे कर्तृत्वदक्ष विज्ञान अध्यापक मा.एम्. डब्ल्यू. जोशी सर यांचा आज 11.06.2022 रोजी 75वा वाढदिवस मोठ्या आनंदाने आम्ही साजरा करीत आहोत. प्रथम मी प्रा. माधव जोशी सर याच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमिताने कुटुंबाच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद देवून हार्दिक शुभेच्छा प्रदान करतो. जोशी सर यांना त्यांचे जुने विद्यार्थी की जे आज कौण वकील आहेत, कोण व्यापारी आहेत. कोण दुध डेअरीचे अध्यक्ष आहेत सर्व स्तरातून आबांना M.W.याच नावाने ओळखले जाते. मा. प्रा. माधव जोशी सर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या कुटुंबाच्या वतीने मन पूर्वक हार्दिक शुभेच्छा; आज माननीय प्राध्यापक माधव जोशी सर यांचा यांचा 75 वा वाढदिवस आहे. जोशी सर यांचा जन्म 11 जून 1948 रोजी ज्येष्ठ गंधर्व संगीत क्षेत्रात वैदिप्यमान इतिहास करणारे संगीत शिक्षक कै. वामनराव जोशी व कै. इंदिराबाई जोशी यांच्या पोटी झाला अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रा. एम. डब्ल्यू जोशी सर यांनी आपले शिक्षण केले. त्यांचे वडील प्रख्यात संगीत शिक्षक व गांधर्व महाविद्याल त्या "आदय प्रणेते काळात प्रा. जोशी सरांना आपली माता कै. इंदिराबाई जोशी व वडील कै. वामनराव जोशी यांचे कौटुंबिक, सामाजिक जीवन जगण्याचे सुसंस्कार मिळाले. आजही त्याच्या पाच बंधूंचे हे एकत्र कुटुंब उच्च शिक्षणासाठी प्रभावी काम पहात आहे. अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व संस्थांबरोबर हे कुटुंब अतिशय जिव्हाळा आहे.अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रा. माधव जोशी सरांच्या सामाजिक दुरदृष्टी युक्ती ध्येयवादाने माणसं पेटून उठतात. आबा म्हणजे युक्तकांना वाटणारा अखंड उर्जा स्त्रोत होय. जोशी सर म्हणजे नवचैतन्याचा
अखंड वाहता झरा सरांकडे कधीही गेल की हसतमुखाने स्वागत करणारच. साठे सर चहा घेऊन जावा. अर्थात कर्मठ ब्राह्मण बहुजन समाजाच्या व्यक्तीला जवळ करीत नाही. परंतु बारामती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी या भागात हाड़ाचे शिक्षक; शिक्षण तज्ञ म्हणून एम.डब्ल्यू. जोशी सर बहुपरीचित आहेत. आबांचे प्रेरणास्थान म्हणजे त्यांचे वडील कै वामनराव जोशी आणि माता कै. इंदिराबाई जोशी होत. माधव जोशी सरांना मी गेल्या पाच वर्षांपासून ओळखतो. 2017 सालापासून मी बारामती ग्रामीण भागातील
शारदानिकेतन इंग्लिश मेडियम स्कूल वसंत नगर येथील शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे. आमच्या संस्थेचे सचिव कै. विकारा गारुतराव आबनावे रार यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडागोड़ी रागजून घ्यायचे. सराचे आम्हाला आपल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सतत मोलाचे मार्गदर्शन मिळणारच.आपणास दिल्ली येथे आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. येत्या 13जुलै रोजी2022. 75 व्या वाढदिवसानिमित्त हे जाहीर करत आहे. जोशी सरांचे भाषण आणि मार्गदर्शन ऐकण्याची संधी मला प्राप्त झाली.तेव्हापासून मी आबा परमेश्वर आहे नंतर मला कळलं की बारामती शहरातील बरेच जण पण वकील असेल कोणी
सांगा उपाध्यक्ष असेल कोणी व्यापारी असेल अशा अनेक विद्याश्यांना डब्ल्यू जोशींनी मार्गदर्शन केले आज एक उत्कृष्ट विज्ञान अध्यापक म्हणून जोशी सरांची ओळख बारामती शहरा सारख्या एका ग्रामीण परिसरामध्ये एम
इब्ल्यू या नावाने ओळख आहे. मी त्यांना प्रेमाने आबा या नावाने संबोधतो किंबहुना त्यांनी कधी मला शिकवल नाहींनी कधी त्यांचा विद्यार्थी नव्हतो परंतु तीन वर्षांमध्ये आबांच्या सहवासाचौ मला लाभ मिळाला. आणि माझे जीवन धन्य झाले आबा यांचा 75 वा वाढदिवस माननीय माधव जोशी सर तथा आदरणीय आबा यांच्या विषयी किती लिहिलं तरी ते कमीच पड़ावे जोशी सर म्हणजे चैतन्याचा खळाळणारा अखंड ऊर्जा सरांकडे पाहिले की वृद्ध व्यक्तीला सुद्धा ताजेतवाने वाटते वाटते कारण सर म्हणजे नवचैतन्याचा प्रेरणा देणारा मोठे ज्ञान भांडारकर होय. जोशी सर यांचे व्यक्तिमत्व त्यांचे व्यक्तिमत्व सतत मार्गदर्शन व प्रेरणा देणारी असते गोरगरीब वंचित पीडित बहुजन समाजाची मुला मुलींच्या शिक्षणाच्या अनेक अडचणी आल्या आबा स्वतःच्या पदरच्या खर्चातून त्यांना मदत करतात. माननीय ऍम डब्ल्यू जोशी सर ज्येष्ठ नागरिक संघाचे बारामती शहराचे अध्यक्षः बारामती नगरपालिकेच्या शिक्षण समितीचे सभापती म्हणून त्यांनी अखंडितपणे कार्य सुरु केले आहे. बारामती शहरांमध्ये कवी मोरोपंत शिक्षण संस्थेचे ते संस्थापक सदस्य असून आणि मान्यवर संस्थाचे पदाधिकारी म्हणून काम पाहत आहे. कविवर्य मोरोपंत शिक्षण संस्था बारामती यांचे ते संस्थापक अध्यक्ष आहे. कविवर्य मोरोपंत स्मारक समिती बारामती यांचे कार्याध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य शोध परीक्षा पुणे यांचे ते समन्वय आहेत. सामान्य ज्ञान स्पर्धा रोटरी क्लब बारामती यांच्या संयोजन समितीचे तीनवेळा सदस्य होते. विज्ञान प्रचारिणी संस्थेचे पुण्याचे कार्यकारिणी सदस्य म्हणुन ते काम पहात आहेत. बारामती शहराच्या संस्कार भारतीचे अध्यक्ष आहेत. आज पर्यंत आबांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले पण तो कधीही त्यांनी गर्व केला नाही आदर्श विज्ञान शिक्षक म्हणून गणित अध्यापक शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या जीवनात मध्ये संपन्नतेचे शिखर पादाक्रांत केली असून सतत प्रसन्नतेनं ते जीवन व्यतीत करीत आहेत. वयाच्या 75व्या वर्षीही यांची गार पाण्याने अंघोळ असते. स्वावलंबनहा त्यांच्या जीवनाची स्थायी भाव होय. सकाळी पाच वाजता उठून दिड तास प्राणायाम करणे, मॉर्निंग वॉक करणे, सायकलिंग करणे, दीड तास आसने करणे त्याच्यानंतर संगीत शिक्षकांचे चिरंजीव असल्यामुळे दररोज दीड तास तरी ते हार्मोनियमचा रियाज स्वतः घेतात संगीत शास्त्रावर हार्मोनियम वाजवण्याचे काम दररोज ते करीत असतात. "वेध अवकाशाचा या विषयावर त्यांनी व्याख्यानं सुद्धा 2000चर दिली. तारकांचा शोध घेण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा अवकाश वेध याविषयी विज्ञानाच्या जवळजवळ दोन
हजार व्याख्यान त्यांनी सादर केली. आज बारामती शहरांमधील असणारा ज्येष्ठ नागरिक संघ समृद्ध आणि सक्षम झाला आहे. राज्यांमध्ये एक नंबरचे हा ज्येष्ठ नागरिक संघ आहे. बारामती ज्येष्ठ नागरिक संघाचं काम जोशी सरांच्या कुशल नेतृत्त्वाच्या जोरावर अविरतपणे अखंडपणे चालू आहे. मा.प्रा. माधव जोशी सर यांच्या विषयी मी एवढंच म्हणेन की "तुम्ही चढताना यशाची उत्तुंग शिखरे,थकवा कधी आला नाही,बिंदूचा सिंधू केला तरी,गर्व गजाला शिवला नाही,
यावीत वर्ष आणिक लोभ आमचा आठवणार नाही.शेवटी तुमचे व्यक्तिमत्व मला आजच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खालील काव्यपंक्ती शोभून दिसते. त्या काव्यपंक्ती अश
"सर्व क्षेत्री जयांचे निरीक्षण,तो एक राजहंस,माधव जयाचे नाव,हाच शारद हंस,आदरणीय सर आपण निष्ठावंत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केला. आपणारा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेतेपदे आपण मिळविली. आपण अभिनंदनास पात्र आहात. भारतीय कर्मचारी मजदूर युनियनचे आपण केंद्रीय सल्लागार आहात. आम्हास आपला अभिमान वाटतो.
आपल्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने आबा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आपण शतायुषी व्हा. 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व सदैव आशीर्वाद राहू द्या.हीच सदिच्छा.
Many many Happy Returns of the Day.इंग्रजी कवी एस. टी. कोलरेज "The Ancient Marnler "या कवितेत कवी लिहितो की,
He preth best,
Who loveth Best,
All things both great and small,
For dear God who loveth us,
He made and loveth all...
वरील काव्य पंक्ति प्रा.एम्. डब्ल्यू जोशी सर यांच्या व्यक्तीमत्वाला शोभून दिसतात . अशी अपेक्षा व्यक्त केली तरी वावगं ठरू नये हीच अपेक्षा.
प्रा. गोरख साठे सर
शारदानिकेतन इंग्लिश मेडियम स्कूल वसंत नगर अॅड ज्यु. कॉलेज सायन्स बारामती जि.पुणे,मो. 9833661268

No comments:

Post a Comment