नवऱ्याने बायकोची बोटे कोयत्याने तोडली,कारण होतं न सांगता घराबाहेर गेल्याचं..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, August 14, 2022

नवऱ्याने बायकोची बोटे कोयत्याने तोडली,कारण होतं न सांगता घराबाहेर गेल्याचं..!

नवऱ्याने बायकोची बोटे कोयत्याने तोडली,कारण होतं न सांगता घराबाहेर गेल्याचं..!
                                                                   बारामती :-काही दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील मोडवे या गावात सख्ख्या भावाने सख्ख्या भावाचा खून केला होता ही बातमी वाचून काही वेळ होत नाहीतोवर दुसरी बातमी धडकली याबाबत सविस्तर माहिती अशी की,न सांगता घराबाहेर गेलेल्या पत्नीवर पतीने कोयत्याने हल्ला केला. यात तिच्या डाव्या हाताची करंगळी व त्याच्या शेजारील बोट तुटले. डाव्या हाताच्या पोटरीवरही गंभीर दुखापत झाली.जखमी महिलेवर बारामतीत खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याबाबत तालुका पोलिसांनी सुदर्शन रणजित जाधव (सध्या रा. बयाजीनगर, रुई, बारामती,
मूळ रा. किणी, ता. आष्टी, जि. बीड) याच्या विरोधात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. जखमी असलेल्या दिपाली सुदर्शन जाधव यांनी याबाबत फिर्याद दिली,हे पती-पत्नी सध्या बारामतीत राहून काम करत उपजीविका करतात. २०११ साली त्यांचा प्रेमविवाह झालेला आहे. तेव्हापासून ते बारामतीतच राहतात. दि.
१० रोजी फिर्यादी महिला तिच्याकडील दुचाकीवरून पेन्सिल चौकात गेली होती. त्यावेळी तिचे पती कामाला गेले होते. सायंकाळी ते घरी आले असताना पत्नी घरात दिसली नाही. त्यांनी तिला फोन करत चौकशी केली असता तिने कामानिमित्त बाहेर आल्याचे सांगितले.
रात्री पावणे आठच्या सुमारास ती घरी गेली असता पतीने मला न सांगता तु घराबाहेर का गेलीस, असे म्हणत तिला थोबाडीत मारली. मॉलमध्ये सेल लागला असून तेथे मी
खरेदीला गेले होते, असे उत्तर फिर्यादीने दिले. त्यानंतर पतीने कोयता हातात घेत तिच्या डोक्यावर मारहाण करून जखमी केले. हातावर कोयत्याने वार केले. त्यात तिची करंगळी व शेजारचे बोट तुटले. ती भितीने घराबाहेर पळून गेली. तेथील लोकांनी तिला दवाखान्यात
दाखल केले.अधिक तपास पोलीस करीत आहे.

No comments:

Post a Comment