स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 15, 2022

स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण*

बारामती दि. १५ :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते प्रशासकीय भवन, बारामती येथे ध्वजारोहण करण्यात आले. 

याप्रसंगी तहसिलदार विजय पाटील,  विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, उप अधिक्षक भूमी अभिलेख गणेश कराड,   सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे,  निवासी नायब तहसिलदार  विलास करे,  नायब तहसिलदार प्रतिभा शिंदे, डॉ.भक्ती सरोदे-देवकाते, महसूल व सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य  सैनिकांचे उत्तराधिकारी, पत्रकार, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थांनी राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीते सादर केली. यानंतर  प्रांताधिकारी कांबळे यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारुन सर्व उपस्थित मान्यवरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

                               

No comments:

Post a Comment