लोकशाहीर साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 3, 2022

लोकशाहीर साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी..

लोकशाहीर साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी..                               बारामती :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे मा.उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्या
वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची
जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी
मा.नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, मा.उपनगराध्यक्ष
अभिजित जाधव, बारामती सहकारी बँकेचे
चेअरमन सचिन सातव, मा. नगरसेवक
राजेंद्र बनकर, अनिता जगताप, विरोधी
पक्षनेते अजित पवार यांचे कार्यालयीन
अधीक्षक हनुमंत पाटील, मा. अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे विश्वासराव देवकाते,मा. नगराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर,मा. उपनगराध्यक्ष भारतदादा अहिवळे, मा. नगरसेविका आरती शेंडगे, प्रियंका मांढरे,वैधकीय अधिकारी डॉ. सदानंद काळे, डॉ. मनोज खोमणे,मा. नगरसेवक अभिजीत चव्हाण, साधू बल्लाळ व इतर उपस्थित होते.सर्व मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ
साठे व महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून
अभिवादन करण्यात आले.अण्णाभाऊ साठे यांचे विचार व लिखाण आजही प्रेरणादाई असल्याचे मा.नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी सांगितले.
अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा प्रचार
व प्रसार होण्यासाठी पुस्तकालय व स्पर्धा
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन
सुरू केले असून सामाजिक बांधिलकी
जपत समाजभूषण भाऊसो मांढरे मित्र
मंडळ, साईच्छा सेवा ट्रस्ट व लहुजी
वस्ताद दहीहंडी संघ यांच्या वतीने वर्षभर
विविध सामाजिक उपक्रम चालू असल्याचे
आयोजक बिरजू मांढरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment