प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कमी किंमतीत कापडी पिशव्या शहरातील बचत गटातील महिला उपलब्ध करुण देणार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 3, 2022

प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कमी किंमतीत कापडी पिशव्या शहरातील बचत गटातील महिला उपलब्ध करुण देणार...

प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कमी किंमतीत कापडी पिशव्या शहरातील बचत गटातील महिला उपलब्ध करुण देणार...                                                           बारामती:- बारामती नगरपरिषद दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत दीक्षा महिला बचत गटांनी कापडी पिशवी बनवणे व विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे,बचत गटांना  पिशवी विक्री करीता बारामती न.प च्या वतीने विपणन विक्री करीता इंदापूर चौक गणेश मार्केट येतील व्यापारी संकुल मधील रिकामा गाळा उपलब्ध करून देणेत आला आहे,प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कमी किंमतीत कापडी पिशव्या शहरातील बचत गटातील महिला उपलब्ध करुण देणार आहेत,शहरातील नागरिक व्यापारी यांनी या उपक्रमास प्रतिसाद देऊन प्लास्टिक बंदी यशस्वी करण्यास हातभार लावून आपली बारामती स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे. सदर दुकानाचे उद्घाटन आधार शहर स्तर संघाचे अध्यक्ष छायाताई धर्माधिकारी यांनी केले. माननीय मुख्याधिकारी महेश रोकडे  यांच्या संकल्पनेतून बचत गटाच्या माध्यमातून आज पासून  कापडी पिशवी व्यवसायाची सुरुवात करण्यात आली. 

आज सर्व महाराष्ट्रभर प्लास्टिक बंदी करण्यात आलेली आहे. कापडी पिशव्यांचा  जास्तीत जास्त वापर करून पर्यावरणाचे संवर्धन करायचे आहे असे आव्हान मुख्याधिकारी यांनी यावेळी केले. सदर कार्यक्रमाला राजश्री जाधव, सलमा तांबोळी, सविता टेकाळे, अली मुल्ला , रोहिणी चांदगुडे ,रत्न रंजन गायकवाड बांधकाम इंजिनिअर, संजय लालबिगे माजी उपनगराध्यक्ष दिपाली लालाबिगे माजी नगरसेविका व संतोष टेकाळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment