कोरोनामुळे दोन वर्षानी लोणीतील कलगीतुर्याला उत्स्फूर्त दाद! तोच जल्लोष! त्याच टाळया! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 2, 2022

कोरोनामुळे दोन वर्षानी लोणीतील कलगीतुर्याला उत्स्फूर्त दाद! तोच जल्लोष! त्याच टाळया!

कोरोनामुळे दोन वर्षानी लोणीतील कलगीतुर्याला उत्स्फूर्त दाद! तोच जल्लोष! त्याच टाळया!

निरगुडसर : (प्रतिनिधी.प्रा. अरुण गोरडे.)
 दिः०२/०८/२०२२. कायतो कलगीतुरा .. काय ती गर्दी.. सगळे कसे ओकेच ओके...!
नागपंचमी निमित्त लोणी ( ता.आंबेगाव ) येथे महाराष्ट्रातील भव्य कलगीतुरा सामन्याचे आयोजन केले होते.यधांचे हे २८ वे वर्षे मागील दोन वर्ष कोरोना महामारीमुळे कलगीतुरा कार्यक्रम झाला नाही.त्यामूळे चालू वर्षी हा कार्यक्रम पाहाण्यासाठी येथील बाजार तळ गर्दीने फुलून गेला होता.शाहीर रामदास गुंड आणि कंपनी तुर्यावाले ( ता.पारनेर ) विरुद्द शाहीर नानासाहेब साळुंखे आणि मंडळी कलगीवाले ( ता. श्रीगोंदा ) यांच्यात हा कलगीतुरा जोरदार रंगला. ढोलकी,टाळ,डफ,संबळ व तुणतुण्याच्या तालावर रंगलेला हा जंगी सामना उपस्थित ससिकाच्या मनात व कानात ज्ञानाची भर टाकून गेला.डफाची थाप,ढोलकीचा गगनभेदी आवाज, शाहिरांनी पहाडी आवाजात सादर केलेली कवने उपस्थितांची दाद घेऊन जातात.देशभक्ती,सर्वधर्म समभाव,मातृ-पितृभक्ती,विविध धार्मिक सवाल-जबाब या विषयांवर सादर झालेली कवने उपस्थितांचे डोळे पानवून गेले. गण गौळण,रामायण,महाभारत,पुराणकथा, शास्त्रीय सवाल,गणिती सवाल व लौकिक सवाल अशा विविध विषयांवर कलगीवाले व तुरेवाले यांचा सवाल चांगलाच रंगला होता.हा कार्यक्रम पाहाण्यासाठी पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील पारनेर,संगमनेर,श्रीगोंदा तालुक्यातील व लोणी- धामणी परिसरातील श्रोत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.कार्यक्रमाला अनेक राजकीय नेत्यांनी सदिच्छा भेटी दिल्या.यामध्ये भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे,विजय पवार, शिवसेना नेते ॲड.अविनाश रहाणे,पंचायत समिती सदस्य राजाराम बानखेले,पारगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक ताठे यांनी भेट दिली.या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच उद्धव लंके यानी केले.

No comments:

Post a Comment