बारामती मधील फलटण रोड, रेणुका नगर मधील एक ड्रेनिज तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात..! बारामती:- बारामती मधील फलटण रोड, रेणुका नगर मधील एक सुंदर दृश्य. गेली कित्येक महिने (7-8 महिने)झाले ड्रेनिज तुंबून पाणी बाहेर येत आहे तसेच ड्रेनिज मध्ये मातीचा ढीग साचलेला असून, ड्रेनिजचे झाकन सुद्धा नाहीत. येथील नागरिकांना ह्याचा त्रास होत असून रोगाला आमंत्रण दिल्या सारखी वेळ आली आहे, त्यात पाऊस, साथीचे आजार, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, कोरोना असे कित्येक रोग पसरत असताना देखील नगर पालिकेचे लक्ष नाही वारंवार नगरपालिकेतील स्वच्छता विभागात अर्ज केला, मुख्यधिकारी यांना अर्ज केला, ठेकेदारास सांगितलं असता फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका केली जाते आणि करून देतो म्हणून आश्वासन दिले जातात. जशी एखादी न्यूज वाऱ्यासारखी पसरते की रस्त्यातील खड्ड्यामुळे कुणाचं जीव गेला आणि त्या नंतरच तो खड्डा बुजवला जातो. त्या प्रमाणे, कुणा एखाद्याच बर वाईट झाल्याशिवाय आणि बारामती मध्ये ड्रेनिज मध्ये पडून............. अशी एखादी वाईट न्यूज आल्यानंतरच ड्रेनिज साफ केल जाईल आणि त्यावर झाकन बसवलं जाईल असं काहीतरी दृश्य दिसतंय. येथे लहान मुलं खेळत असतात आणि हे ड्रेनिज १०-१२ फूट खोल आहे, तात्काळ बारामती नगर पालिकेने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ड्रेनिज स्वच्छ करावे अशी मागणी स्थानिक रहिवासी गेले कित्येक दिवस झाले करीत आहे.
Post Top Ad
Wednesday, August 24, 2022
Home
ताज्या घडामोडी
बारामती
बारामती मधील फलटण रोड, रेणुका नगर मधील एक ड्रेनिज तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात..!
बारामती मधील फलटण रोड, रेणुका नगर मधील एक ड्रेनिज तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात..!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment