बापरे..महिलांना पाहून फिरवायचा स्टीलच्या धातुच्या नग्न मूर्तीवर हात,अधीक्षक अभियंताने गाठला चावट पणाचा कळस..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 23, 2022

बापरे..महिलांना पाहून फिरवायचा स्टीलच्या धातुच्या नग्न मूर्तीवर हात,अधीक्षक अभियंताने गाठला चावट पणाचा कळस..!

बापरे..महिलांना पाहून फिरवायचा स्टीलच्या धातुच्या नग्न मूर्तीवर हात,अधीक्षक अभियंताने गाठला चावट पणाचा कळस..!
औरंगाबाद :- कोण कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही, विकृतीचा कळस गाठला जात आहे, चक्क अधीक्षक अभियंता पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याने चावट पणाचा कळस गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत माहिती अशी की,औरंगाबादमधील महावितरण कार्यालयातील
आहे.सदर अधिकारी हा सहकारी अधिकारी महिला या कार्यालयात आल्यावर तो त्याच्या कक्षात टेबलवर ठेवलेल्या एका स्टीलच्या नग्न मूर्तीवर हात फिरवायचा.त्याचबरोबर तो चुकीच्या पद्धतीने देखील अधिकारी महिलांकडे पाहत असल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. प्रवीण मारोतीराव दरोली असं ५१ वर्षीय अधीक्षक अभियंत्याचे नाव आहे. प्रवीण दरोली या अधिकाऱ्यावर आता त्याने केलेल्या अश्शील कृत्यामुळे त्याला जेलची हवा खावी लागणार आहे. कारण,महिलांनी अधीक्षक अभियंत्याच्या नेहमीच्या कृत्याला वैतागून थेट पोलीस ठाणे गाठले आहे. महिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभियंत्या विरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरोली यांच्या कॅबिनमध्ये एक स्टीलच्या धातुची नग्नवस्थेतील मूर्ती टेबलावर ठेवलेली असायची. मिळालेल्या माहितीनुसार, अधीक्षक अभियंता हा कार्यालयातील कुठल्याही महिला अधिकाऱ्याकडे वाईट नजरेने बघत होता. त्याचबरोबर अभियंता दरोली यांच्या कॅबिनमध्ये एक स्टीलच्या धातुची नग्नवस्थेतील मूर्ती टेबलावर ठेवलेली असायची. कार्यालयातील सहकारी महिला कामानिमित्ताने कॅबिनमध्ये गेल्यास दरोली हा महिलांना वाईट नजरेने पाहून त्या नग्न मूर्तीवर अश्शील रित्या हात फिरवायचा. हा प्रकार जानेवारी २०२२ पासून सुरू होता. अशी माहिती त्याच्या सोबत काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे. महिला अधिकारी हे सतत होत असलेल्या अभियंत्याच्या अश्शील कृत्याला कंटाळले होते. अखेर त्यांनी पोलीसाकडे केलेल्या तक्रारीमुळे
अभियंत्याचे बिंग फुटले आहे. पोलिसांनी फिर्यादी अधिकारी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली याच्या
विरोधात गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment