विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या गेटवर अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग.!एमआयडीसी ठिकाणी वाढती गुन्हेगारी थांबेल का? बारामती:-माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अधिवेशनात बारामतीत घडत असलेल्या अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे कशी वाटचाल करतात त्याच्या मागचे कारण काय असतं हे मांडलं असताना पुन्हा बारामतीत मुलींवर अत्याचार होत असल्याचे समोर आलं बारामती
शहरातील एमआयडीसी भागात असणाऱ्या
संदीप कॉर्नर जवळ क्लाससाठी जात
असताना विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या गेट समोर
१० वी मध्ये शिकत असणाऱ्या अल्पवयीन
विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला.
याबाबत २३ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा फिर्याद
दाखल करण्यात आली आहे. आरोपी विरुध्द
बारामती तालुका पोलिस स्टेशन येथे पोकसो
व भारतीय दंड संहितेच्या कायद्यांतर्गत गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मध्ये नमूद असल्याप्रमाणे पूर्ण नाव माहीत नसलेला
आरोपी एक्का चौधर व एका अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती तालुका पोलिस स्टेशन जवळ असलेल्या विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या गेट वर असा प्रकार घडणे ही अतिशय भीतीचे वातावरण तयार करणारी बाब
आहे.अश्या प्रकारच्या घटना भविष्यात घडू
नये यासाठी पोलिस प्रशासनाने काळजी घेणे
आवश्यक आहे.तर एमआयडीसी भागात वाढती गुन्हेगारीला आळा घालणे महत्वाचे आहे याभागात महिला मोठ्या प्रमाणात कामासाठी येत असतात त्यामुळे काही अनर्थ होऊ नये यासाठी वेळीच वाढती गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागरीकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
No comments:
Post a Comment