बारामती शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी,गुणवडीतून हरवलेल्या पाच मुलांचा कौशल्याने व जलद तपास.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 22, 2022

बारामती शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी,गुणवडीतून हरवलेल्या पाच मुलांचा कौशल्याने व जलद तपास..

बारामती शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी,गुणवडीतून हरवलेल्या पाच मुलांचा कौशल्याने व जलद  तपास..

बारामती:- सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे वरिष्ठ कार्यालयाकडून पोलीस ठाण्यांना सतर्क सूचना आहेत की महिला मुले. यांच्या बाबतीत घडणाऱ्या घटनांचा तपास तात्काळ व संवेदनशील पणे करावा. माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण डॉक्टर अभिनव देशमुख यांचे सुद्धा याबाबत सतर्क आदेश आहेत 

गुणवडी गावातून१)राधिका प्रकाश साठे वय १३वर्ष २)प्रज्योत प्रकाश साठे वय ११ वर्ष ३)प्रतीक्षा कल्याण कुचेकर 14 वर्ष ४)साक्षी कल्याण कुचेकर वय १३ वर्ष ५)मानसी कल्याण कुचेकर वय ११ वर्ष असे चार मुली व एक मुलगा कस्तान चाळ येथून सकाळी १०.०० वाजल्यापासून अद्याप पर्यंत गायब आहेत. अनुक्रमण नंबर एक व दोन हे बहिण भाऊ असून अनुक्रमांक तीन ते पाच या तिघी बहिणी आहेत व ते पाचही जण मावसभाऊ आहेत. तिघी बहिणी माळेगाव वरून मावशीकडे आलेले आहेत. एकाच घरातील अल्पवयीन बहिण-भावाडे गायब झाल्यामुळे. गुणवडी गावात सुद्धा लहान मुलांना पकडणारी टोळी आलेली आहे अशा अफवा पसरू लागल्या. सदर बाबत नातेवाईकांनी बारामती शहर पोलीस ठाण्याला सायंकाळी चार वाजता कळवले. ठाणे अंमलदार अधिकारी कर्तव्यावर असलेले युवराज घोडके यांनी त्यांची तक्रार ऐकून तात्काळ पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या कानावर ही गोष्ट घातली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक महाडिक यांनी पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके. तुषार चव्हाण अक्षय सीताप शाहू राणे यांना सरकारी वाहन घेऊन तात्काळ गुणवडी या ठिकाणी जाऊन माहिती घेण्यास सांगितले. त्या ठिकाणी सुद्धा आलेल्या तक्रारी प्रमाणे दहा वाजल्यापासून सदर मुले घरातून गायब असल्याची माहिती कळाली त्यानंतर ग्रामस्थांच्या पोलीस पाटलाच्या मदतीने पोलिसांनी चोहो बाजूने तपास सुरू केला असता मेखळी या ठिकाणी एका दुकानदाराने ती पाची भावंडे पाहिल्याचे सांगितले व ते वालचंद नगरचा रस्ता विचारत असल्याचे सांगितले. नंतर पोलिसांनी शोध मोहीम वालचंद नगरच्या दिशेने सुरू केली सोबत काही पोलीस मित्र घेतले. त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान वालचंद नगर जंक्शन या ठिकाणी दोन मुली प्रथम पोलिसांना मिळून आल्या त्यांनी मिळाल्यानंतर सांगितले की त्यांना ओमनी गाडीत घालून त्यांना मामाकडे भेटायला घेऊन जात आहे असे सांगून गाडीत बसवले व त्यांना वालचंद नगरच्या दिशेने घेऊन आले व त्यांना त्या ठिकाणी सोडले अशा रीतीने हाकिकत सांगितले .ही माहिती ऐकल्यानंतर तर पोलिसांच्या हृदयाचा ठेका दोन मिनिट चुकलाच. पोलिसांनी त्या ठिकाणी वालचंद नगरचे पोलीस मित्र व स्थानिक पोलीस यांच्या मदतीने शोध मोहीम आणखी तीव्र केली. काही वेळानंतर त्याच भागामध्ये आणखी दोन मुली मिळून आल्या. त्यानंतर पोलिसांचा जीव थोडा भांड्यात पडला आणि मग कौशल्याने त्या सर्व मुलांना विचारात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या मुलांनी कबुली दिली की त्यांना कोणीही ओमनी गाडीतून अपहरण केलेले नाही तर त्यांचा मामा ही सर्व मुले अभ्यास करत नाही म्हणून रागवतो तसेच सकाळीच त्याने प्रज्योत याला सुद्धा खडसावले होते म्हणून त्या सर्वांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला होता आता पोलीस आणि नातेवाईक रागावतील म्हणून त्यांनी या प्रकारचा बनाव केल्याचे सांगितले. प्रज्योत याने घरीच चीठी सुद्धा लिहून ठेवलेली आहे की त्यांचा शोध घेऊ नका ते मोठे बनूनच घरी येतील. त्यानंतर पोलिसांनी प्रज्योत याचा शोध सुरू केला असता प्रज्योत हा पोलीस व नातेवाईकांना बघून पळून जाऊ लागला त्यानंतर रात्री उशिरा साडेआठ वाजता त्यालाही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तपासात निष्पन्न झाले की त्यांचा मामा त्यांच्यावर अभ्यास करत नाही म्हणून रागावला होता त्या सर्व बालकांच्या दोघी आई ह्या सख्या बहिणी असून त्या दोघी सकाळी दवाखान्यात दहा वाजता बारामतीला आलेले असताना वरील सर्व मुलांनी घरातून जाण्याचा निर्णय घेतला सोबत कपडे व पिशवी घेतलेली होती नंतर रोडला येऊन ट्रकचालकाला विनंती करून वालचंद नगर जंक्शन या ठिकाणी त्या उतरल्या होत्या. पोलिसांनी जर कौशल्याने आणि तत्परतेने तपास केला नसता तर घटनेचे गांभीर्य खूप मोठे होऊ शकले असते मुलांनी काहीतरी वेगळा विचार करून घरी न जाण्याचा निर्णय करून घरातून बाहेर पडले असल्याने वेगळ्या मार्गाने गेले असते तर एखाद्या अपराधाची सुद्धा ती शिकार होऊ शकले असते. परंतु सदर तपास पोलिसांनी अतिशय संवेदनशील पणे तत्परतेने केला व व सर्व मुले पालकांच्या ताब्यात दिली त्या ठिकाणी पालकांचे सुद्धा पोलिसां तर्फे सामुपदेशन करून लहान मुलांना रागावून खडसावून कोणतीही गोष्ट करू नका त्यांना विचारात घेऊन समजूतदारपणे त्यांच्याशी वागा असा सल्ला देऊन सर्व मुले ही त्यांच्या आईच्या व मामाच्या ताब्यात देण्यात आली. सदरचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व अप्पर पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

No comments:

Post a Comment