माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या एकूण २३ गावातील सार्वजनिक गणेश मंडळांची शांतता बैठक संपन्न..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 26, 2022

माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या एकूण २३ गावातील सार्वजनिक गणेश मंडळांची शांतता बैठक संपन्न..!

माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या एकूण २३ गावातील सार्वजनिक गणेश मंडळांची शांतता बैठक संपन्न..!
माळेगाव:- आगामी गणेश उत्सव २०२२ अनुषंगाने  माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या एकूण २३ गावातील सार्वजनिक गणेश मंडळ पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील यांची शांतता बैठक आज गुरुवार दि. २६/०८/२०२२ रोजी दु.१२.०० वा  ते ०१.१५ वा चे दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती.
              सदर बैठकीस उपस्थितांना माळेगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.किरण अवचर यांनी माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील यंदाचा गणेश उत्सव भक्तिमय व शांततेच्या वातावरणात पार पडण्याकरिता व कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून  चालू वर्षीपासून सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून प्रदूषण विरहित इको फ्रेंडली श्री.गणेशमूर्ती स्थापना, आरोग्य तपासणी - रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांकरिता विविध शालेय क्रीडा स्पर्धा, समाजप्रबोधनात्मक संदेश- देखावा, डी जे विरहित पारंपारिक वाद्य मध्ये विसर्जन मिरवणूक इ. मध्ये चांगले कार्य करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळ यांची परीक्षक मार्फत पडताळणी करून गुणांच्या आधारे १ ते ५ सर्वोत्कृष्ट मंडळांची निवड करून त्यांना माळेगाव पोलीस स्टेशन वतीने श्री गणराया सेवा पुरस्कार साठी निवड करण्यात येणार असून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात येणार असले बाबतची माहिती  देवून जास्तीत जास्त मंडळ यांनी या स्पर्धेत सहभागी होवून खऱ्या अर्थाने सेवाभावी वृत्तीने श्री.गणेश उत्सव साजरा करणेचे आवाहन करून खालील प्रमाणे प्रमुख सूचना देऊन पो.नि.श्री.अवचर यांनी मार्गदर्शन केलेले आहे.
*१) उत्सवासाठी मंडप टाकताना वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी.*
*२) गणेशोत्सवात धार्मिक - जातीय तेढ निर्माण होईल अशा आशय किंवा स्वरूपाचे नसावेत.*
 *३) मिरवणुकीमध्ये डी. जे. चा वापर करू नये.* 
*४) गणेशोत्सवामध्ये अनावश्यक  खर्च कमी करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.*
*५) गणेश मूर्तीच्या संरक्षणासाठी २४ तास स्वयंसेवक नेमावेत.*
*६) वर्गणीसाठी कोणीही नागरिकांवर तसेच रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांवर जबरदस्ती करणार नाही.*
*७) गणेश मंडळांनी वीज वितरण कंपनीकडून रीतसर परवानगी घेऊन तात्पुरते कनेक्शन घ्यावे कोणीही चोरून विजेचा वापर करू नये.*
 *८) सार्वजनिक गणेश मंडळ यांनी श्री गणेश मूर्ती स्थापन करणे साठी पोलीस स्टेशन व इतर कार्यालयाची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे.* 
 *९) श्री गणेश आगमन दिवशी मिरवणूक आयोजन करू नये* 
          त्या अनुषंगाने ऑनलाइन अर्ज कसा करायचा याबाबतही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. 
         सदर बैठकीत महिला, मुली यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बारामती पोलीस उपविभागाचे निर्भया पथक मधील महिला पोलीस हवालदार अमृता भोईटे यांनी महिला सुरक्षा, Dail ११२ बाबत सखोल मार्गदर्शन केलेले असून सदर कार्यक्रम करिता श्री गणेश मंडळ  पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, यांचे सह पत्रकार बांधव उपस्थित होते.
       प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक श्री तुषार भोर यांनी व आभार प्रदर्शन गोपनीय शाखेचे पोलीस नाईक श्री.ज्ञानेश्वर सानप यांनी केलेले आहे.

No comments:

Post a Comment