*श्री छत्रपती शाहू हायस्कूल बारामती येथे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरा* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 29, 2022

*श्री छत्रपती शाहू हायस्कूल बारामती येथे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरा*

*श्री छत्रपती शाहू हायस्कूल बारामती येथे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरा* 

बारामती:- रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व जुनिअर कॉलेज बारामती येथे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून साजरा करण्यात आला 
 रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य माननीय श्री सदाशिव बापू सातव यांच्या मार्गदर्शनाखाली आज क्रीडा दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या कान नाक घसा तज्ञ डॉ.सौ. रेवती राहुल संत या उपस्थित होत्या या कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली कार्यक्रमास मा. मुख्याध्यापक श्री. बी. एन. पवार साहेब शिक्षक प्रतिनिधी श्री. जी.आर.तावरे क्रीडा विभाग प्रमुख श्री एस. एम. जाधव तसेच सी .बी .देवकाते,  एन. एस. वनवे , ए ए कोकरे , एस. टी. राऊत ,  एस. डी. भोसले तसेच महिला शिक्षिका सौ. तृप्ती कांबळे, सौ. सोनाली हांडे, सौ. सुनीता कोकरे,  सौ.प्रियांका कदम उपस्थित होते. 
या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या काना घसा तज्ञ डॉक्टर रेवती राहुल संत यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा व आहारशास्त्र क्रीडा व मानसशास्त्र तसेच क्रीडा आणि वैद्यकशास्त्र यांचा कसा घनिष्ठ संबंध असतो याचे महत्त्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषणातून समजावून दिले.
            मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त शाळेत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. वयोगट 14 मुले- मुली वयोगट 17 मुले -मुली यांचे खो -खो कबड्डी व हॉलीबॉल या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता आणि खेळाचा आनंद घेतला, कार्यक्रमाचे नियोजन श्री सुनिल म्हस्के यांनी केले सूत्रसंचालन श्री सुजित कुमार जाधव यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार श्री गणपतराव तावरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment