रिक्षा चालकांनाही सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे - प्रा. डॉ. भीमराव मोरे* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 26, 2022

रिक्षा चालकांनाही सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे - प्रा. डॉ. भीमराव मोरे*

*रिक्षा चालकांनाही सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे - प्रा. डॉ. भीमराव मोरे*

     बारामती (प्रतिनिधी) - रिक्षा चालक हा सकाळ पासून रात्री दहा वाजेपर्यंत प्रामाणिकपणे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत असाला तरी तो देखील एकप्रकारे समाजसेवाच करत असल्याने त्यालाही स्वाभिमानाने जगण्यासाठी सन्मानाची वागणूक मिळायला पाहिजे असे उदगार बारामती, दौड, इंदापूर ऑटो रिक्षा कृती समितीचे सचिव प्रा. डॉ. भीमराव मोरे यांनी काढले.
      बारामती, दौन्ड, इंदापूर ऑटो रिक्षा कृती समितीचे अध्यक्ष प्रशांत (नाना) सातव याची राष्ट्रीय ऑटो रिक्षा, टॅक्सी फेडरेशनच्या महाराष्ट्र सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल फलटण रोडवरील सिद्धीराज लॉन्स येथे रविवारी (ता. २५) सत्कार सोहळा आयोजित केला होता त्याप्रसंगी प्रा. मोरे बोलत होते.
       या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माळेगाव सह.चे संचालक ऍड. गुलाबराव गावडे, होते. तर श्री. संजय तावरे (माजी विश्वस्त शिवनगर विद्याप्रसारक, माळेगाव) बाबा कोरी, जावेदभाई सय्यद या प्रमुखांसह बारामती, इंदापूर, दौन्ड येथील दोनशेशेहून अधिक रिक्षाचालक उपस्थित होते.
      'कर्तव्याची जाण, हक्काचा अभिमान, तीन चाकावरील चार भिंतीचा संसार, हे ब्रीदवाक्य सांगून श्री. मोरे म्हणाले रिक्षाचालकांना न्यायहक्क मिळवून देण्याबरोबरच समाजात स्वाभिमानाने जगता यावे तसेच सरकारी दरबारीही त्यांना मान सन्मान मिळावा यासाठीही आपण त्यांची साथ सोडणार नसल्याचे सांगितले.
     श्री प्रशांत सातव म्हणाले या फेडरेशनच्या सचिवपदी डॉ. भीमराव मोरे यांचीच नियुक्ती व्हायला पाहिजे होती, कारण ते रिक्षा चालक मालकांच्या जीवनावर पी. एच. डी. झालेले महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती आहेत. बारामती, इंदापूर, दौन्ड या तिन्ही तालुक्यातील रिक्षा बांधवांच्या अडीअडचणी सोडवू सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत रिक्षा चालवतो तेव्हा त्याची चूल पेटते, अशा कष्टकरी रिक्षाचालकांना वाऱ्यावर न सोडता त्यांना बरोबर घेऊन काम काम करणार असल्याचे सांगितले. तसेच स्वतःचे घर नसलेल्या रिक्षा चालकांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ही यावेळी सांगितले.
     श्री. प्रशांत सातव या जबाबदार व्यक्तीची राष्ट्रीय ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या महाराष्ट्र सचिव पदी निवड झाल्याबद्दल श्री. गुलाबराव गावडे यांनी समाधान व्यक्त केले. रिक्षाचालकही मुख्यमंत्री होऊ शकतो याची आठवण करून देत श्री गावडे पुढे म्हणाले रिक्षा चालक हे साधारण नाहीत ते संघटीत नसल्याने त्यांची दयनीय अवस्था झाल्याचे सांगितले.
      सदर सत्कार सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी बारामती ऑटो रिक्षा कृती समितीचे पदाधिकारी दादासो शिंदे, अण्णा समींदर, लियाकत सय्यद, किशोर कांबळे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले तर उत्तमराव लोंढे यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. तर उपस्थितीतांचे आभार अशोक कांबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment