विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी महिला पोलिसांना उंचीवरून हिणवलं...
अर्थमंत्री भरतीला मान्यता देत नाही तोपर्यंत भरती करता येत नाही..
बारामती :- पोलीस भरतीत महिलांना पाच फूट दोन इंच उंचीची अट असते.. पण ही उंची फारच कमी असते.. पोलीस भरतीसाठी आम्हीच निर्णय घेतला पन्नास टक्के मुली आणि पन्नास टक्के मुलं परंतु एखादा चोर आला आणि त्याने ढकल तर पडलं पण नाही पाहिजे असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महिला पोलिसांना हिणवलं.. ते बारामतीतील सह्याद्री अकॅडमीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पोलीस प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते..
*अजित पवार - महिला पोलीस - जोपर्यंत राज्याचा अर्थमंत्री भरतीला मान्यता देत नाही तोपर्यंत भरती करता येत नाही... देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखात आणि अर्थ खाते देखील आहे त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर भरती केली पाहिजे राज्यात जवळपास पाऊण लाख नोकर भरतीची आवश्यकता आहे.. आमचं सरकार असताना जिथे जिथे जागा कमी असतील तिथं तिथं मान्यता देण्याचे काम आम्ही केले.. स्वर्गीय आर आर पाटील यांच्या कार्यकाळात दरवर्षी 11 हजार पोलीस भरती केली.
No comments:
Post a Comment