शोले पिक्चर स्टाईल एका युवक करत होता आत्महत्याचा प्रयत्न बारामती शहर पोलिसांनी वाचवले मदयपी युवकाचे प्राण.
बारामती:-कुणाला केव्हा काय बुद्धी सुचेल सांगता येत नाही, शोले पिक्चर स्टाईल एका युवकाने केला प्रयत्न याबाबत माहिती अशी की,वेळ रात्रीचे पावणे अकराचे बारामती शहर पोलिस रात्र गस्त सुरू करण्याच्या तयारीत होते. दिवस पाळी अधिकारी कर्मचारी नुकतेच घरी गेले होते.पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा मोबाईल वर व बारामती शहर पोलीस ठाण्याच्या दूरध्वनी क्रमांकावर एक सारखा फोन येऊ लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या छतावर एक युवक चढलेला असून त्याचे घरात किरकोळ भांडण होऊन तो आत्महत्या करतो असे म्हणत आहे. त्यावेळी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी ठाण्यात बीट मार्शल यांना व संपूर्ण गुन्हे तपास पथकाला तात्काळ पोलीस गाडी घेऊन घटनास्थळी जाण्यास सांगितले. त्या ठिकाणी गेलो असता युवक दिनेश हनुमंत मिसाळ वय 22 वर्षे राहणार आमराई हा घरात आईसोबत किरकोळ वाद झाल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम च्या पिडीसी बँक च्या बाजूने छतावर चढलेला होता. सदर युवक हा दारूच्या अंमलाखाली होता. घरात किरकोळ वाद झाल्याने त्याची मनस्थिती बरोबर नव्हती. अशा मध्ये आजूबाजूच्या लोकांची गर्दी सुद्धा त्या ठिकाणी होऊ लागली. त्यावेळेस पोलिसांनी सदर परिस्थिती अतिशय कौशल्याने हाताळून. त्याला खालून भावनिक आवाहन करून. पोलीस मित्र व समाजसेवक यांची मदत घेऊन. त्याला खाली परत उतरण्याचे आवाहन केले. सदर युवक दारूच्या अमलाखाली असताना उंचीवरून त्याला परत उतरणे हे सुद्धा अवघड होते. त्याचा तोल गेला असता तर एखादी अप्रिय घटना घडली असती. परंतु पोलिसांनी अतिशय कौशल्याने सदर परिस्थिती हाताळली व सदर युवकाला खाली उतरून त्यांचे नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्याच वेळेस पोलिसांनी फायर ब्रिगेड ला सुद्धा उंच सीडीसाठी पाचरण केलेले होते. परंतु फायर ब्रिगेड येण्या अगोदरच पोलीस त्याला भावनिक आवाहन करून खाली घेण्यात यशस्वी झाले होते. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, पोलीस कर्मचारी शेख, पोलीस नाईक शिंदे देवकर, कर्मचारी बंडू कोठे व मंगलदास निकाळजे, रवी सोनवणे नगरपालिका कर्मचारी शिंदे यांनी पोलिसांना सहकार्य केले.
No comments:
Post a Comment