खळबळजनक..लाच घेताना पकडलेल्या पोलिसाचे एसीबीचा ट्रॅप लक्षात येताच दुचाकीवरुन पलायन...
नांदेड :- लाचखोरीचे प्रमाण वाढत असताना नुकताच दोन हजार रुपये लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना चकमा देऊन पलायन केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.20) सायंकाळी बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. बीट जमादार तैनात बेग याला दोन हजार रुपये लाच घेत असताना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते. नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप
अधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी बेग याने तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाच
स्विकारून पैसे खिशात ठेवले. त्यावेळी नांदेड
एसीबीच्या पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी पुढे सरसावले. एसीबीचा ट्रॅप लक्षात येताच बेग याने दुचाकीवरुन पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. नांदेड एसीबीच्या पथकाने बेग याचा बराच पाठलाग केला. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नाही.याप्रकरणी मध्यरात्री बेग याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment