दिवाळीनिमित्ताने रेशनकार्ड धारकांना 100 रु मध्ये दिवाळी किट योजनेचे वाटप... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, October 20, 2022

दिवाळीनिमित्ताने रेशनकार्ड धारकांना 100 रु मध्ये दिवाळी किट योजनेचे वाटप...

दिवाळीनिमित्ताने रेशनकार्ड धारकांना 100 रु मध्ये दिवाळी किट योजनेचे वाटप...                       बारामती:- समाजातील सर्व घटकांची दिवाळी गोड होणेसाठी भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना यांच्या युती सरकारने दिवाळीनिमित्ताने रेशनकार्ड धारकांना 100रु मध्ये दिवाळी किट योजना लागु केली असुन त्या योजनेचा प्रारंभ बारामती शहर येथे स्वस्त धान्य दुकानदार योगेश कांतीलाल चौहान,
नगर परिषद शाळा नंबर २ शेजारी.कसबा बारामती याठिकाणी श्री दादासाहेब कांबळे प्रांतअधिकारी,पंचायत समिती गटविकास अधिकारी अनिल बागल व श्री.विजय पाटील तहसीलदार बारामती,श्री. सतिश फाळके भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष,व राजेश कांबळे भाजपा नेते, संतोष जाधव सचिव भाजप बारामती, सुधाकर पांढरे भाजप कार्यकर्ते,गिरमे सह चव्हाण बंधू व लाभधारक नागरिक यांच्या उपस्थिती मध्ये या योजनेच्या किट वितरणाची सुरुवात दिनांक 20/10/2022 रोजी  करण्यात आली.

No comments:

Post a Comment