बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये कापसाला रू.९०००/- दर... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 9, 2022

बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये कापसाला रू.९०००/- दर...

बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये कापसाला रू.९०००/- दर...

बारामती:- कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य यार्ड मध्ये बुधवार दि. ९/११/२०२२ रोजी कापसाला रू. ९०००/-  प्रति क्विंटल दर मिळाला. मागणी व बाहेरील खरेदीदार येत असल्याने कापसाचे दरात वाढ होत असुन आवारात आजही जवळपास १०० क्विंटल आवक झाली. कापसाला सरासरी रू. ८५००/- चा दर मिळाला. आठवड्यातील बुधवार आणि शनिवार या दिवशी कापसाचे लिलाव सुरू असतात. कापसाचे आवकेत वाढ झाल्यास आणखी बाहेरील पेठेतील खरेदीदार येतील अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप व प्रशासक मिलिंद टांकसाळे यांनी सांगितले.    
बारामती बाजार समिती मध्ये कापुस लिलावास प्रारंभ झाले पासुन कापसाला मागणी वाढत आहे. कापसाचे दरात आणखी वाढ होईल. आज बिड व इतर ठिकाणच्या व्यापा-यांनी लिलावात भाग घेतला. कापुस विक्री आवारा बाहेर परस्पर दर ठरवुन न करता स्पर्धात्मक लिलावात विक्री करणे भविष्याच्या दृष्टीने शेतकरी हिताचे आहे. आवारात कुठलीही कटती नाही. ज्या त्या दिवशी लिलाव, वजनमाप आणि पेमेंट शेतक-यांना दिले जाते. त्यामुळे बाजारपेठेत कापुस आवक वाढेल असा विश्वास बारामतीचे आडते व्यापा-यांनी व्यक्त केला. मार्केट मध्ये कापुस विक्री सुरू केल्याने भविष्यात कापसाची लागवड वाढणार आहे. त्यासाठी बाजार समिती तर्फे लवकरच कापुस उत्पादकांचा मेळावा घेणार असलेने प्रशासक मिलिंद टांकसाळे व सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment