काय सांगता..गजबजलेल्या बारामतीत पाटस चौकात(देशमुख चौक) cctv कॅमेरे नाहीत.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 8, 2022

काय सांगता..गजबजलेल्या बारामतीत पाटस चौकात(देशमुख चौक) cctv कॅमेरे नाहीत.!

काय सांगता..गजबजलेल्या बारामतीत पाटस चौकात(देशमुख चौक) cctv कॅमेरे नाहीत.!                                                                             बारामती:-बारामती हे गजबजलेले शहर आहे या शहरात येणारे हजारो लाखो नागरिक वेगवेगळ्या भागातून येत असतात त्याच बरोबर वाहने देखील येत असतात अश्या वेळी महत्वाच्या चौकात cctv कॅमेरे गरजेचे आहे, परंतु बारामती ते पाटस कडे जाण्याऱ्या पाटस चौकात जो चारीबाजूने वाहतूक होत असते तसेच रिंग रोड देखील आहे अश्या चौकात cctv कॅमेरे नाहीत ही बाब कुठेतरी मनाला खटकते, असेही कळतंय की याठिकाणी कॅमेरे लावले होते पण ते गायब झालेत अशी चर्चा आहे, या चौकात ये जा करणारी वाहने याचे अपघात होतात तर अनेक वाळू, मुरूम, खडी वाहणारे ट्रक जे ओव्हरलोड भरून वाहतूक करतात यामुळे अनेक अपघात झालेत या अश्या अपघाताची माहिती जर याठिकाणी cctv कॅमेरे असते तर नक्की मिळु शकली असती, पण जाणून बुजून याठिकाणी कॅमेरे न बसविण्याचे कारण काय असू शकत?हे समजायला मार्ग नाही.बारामती शहरात एखादी विपरीत घटना घडली तर या घटनेतील आरोपी किंवा चोर पळून जाताना या चौकातील कॅमेरात टिपली जातील व पोलिसांना याची माहिती मिळू शकते अश्या विविध कारणासाठी व बारामतीकरांच्या सुरक्षितेसाठी cctv कॅमेरे बसविणे गरजेचे आहे अशी मागणी सामाजिक संघटना करीत आहे, तरी या मागणीची पूर्तता लवकर व्हावी यासाठी निवेदन देण्यात येणार असून तात्काळ cctv कॅमेरे बसवावे ही मागणी करणार असल्याचे समजते.

No comments:

Post a Comment