धोकादायक अॅडिनोव्हायरसचा प्रादुर्भाव वाढतोय;घरातील लहान मुलांना सांभाळा..!
पुणे:- अॅडिनोव्हायरसमुळे ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा मुलांवर याचा जास्त प्रमाणात परिणाम होतो.पुण्यात लहान मुलांची सांभाळण्याची गरज आहे.शहरातील अनेक लहान मुलांमध्ये अॅडिनोव्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मुलांमध्ये काहीही बदल दिसल्यास किंवा त्यांच्या प्रकृतीत काही बिघाड
जाणवल्यास तातडीने डॉक्टरांकडे दाखवा, असं
आवाहन करण्यात येत आहे. या अॅडिनोव्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरातील अनेक लहान मुलांच्या
दवाखान्यात गर्दी बघायला मिळत आहे.
शाळकरी मुलांना ताप येणे, टॉन्सिल्स, घसा खवखवणे आणि डोळे लाल होणे अशा तक्रारींमध्ये अचानक वाढ झाल्याचं शहरातील बालरोगतज्ञ सांगत आहे. या सगळ्या तक्रारी फक्त लहान मुलांमध्ये जाणवत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. 70% आजारी
मुलांमध्ये अॅडिनोव्हायरसची लक्षणं दिसत आहे. 5 ते 15 या वयोगटातील मुलांमध्ये या व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवत आहे. गेल्या महिनाभरापासून पुण्यातील मुलांमध्ये अॅडिनोव्हायरसचा संसर्ग मुलांमध्ये दिसून येत आहेत.मात्र गेल्या काही दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शनमध्ये अचानक वाढ झाली आहे. अॅडिनोव्हायरस व्यतिरिक्त,
इन्फ्लूएंझा विषाणू आणि राइनोव्हायरस याचेदेखी रुग्ण आढळत आहे. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टकांकडून सांगण्यात आलं आहे.खूप काळ टिकणाऱ्या खोकल्याने पालक त्रस्त पुण्यात सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे.
याचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होत आहे.
अनेकांना ताप, सर्दी आणि खोकल्याच्या समस्या
जाणवत आहेत. मात्र खोकला फार काळ टिकत
असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवाय लहान मुलांनाही खोकल्याचा त्रास होत असल्याने पालकही त्रस्त झाले आहे. या सगळ्यांच नीट निरीक्षण करा आणि तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. कोणताही ताप दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ असेल, बाळाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असेल, तीव्र सर्दी खोकला असेल आणि घरातील इतर लोक आजारी असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, असंही
डॉक्टरांनी सांगितलं,काय आहे हा अॅडिनोव्हायरस?अॅडिनोव्हायरस हा एक विषाणू आहे जो श्वसननलिका,आतडे,डोळा, मूत्रमार्गाच्या अस्तरांवर वाढतो. या विषाणूमुळे सर्दी, न्यूमोनिया, पचनाचे आजार आणि लघवी संसर्ग होऊ शकतो. या विषाणूचे डझनभर प्रकार आहेत परंतु या उद्रेकामागे अॅडिनोव्हायरस 7 असल्याचे म्हटले जाते. अॅडिनोव्हायरस 7 विशेषतः धोकादायक आहे आणि त्यामुळे न्यूमोनियासह मोठ्या श्वसनाच्या गुंतागुंत होऊ
शकतात. अॅडिनोव्हायरसमुळे मृत्यू होत नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा मुलांवर याचा जास्त प्रमाणात परिणाम होतो.
No comments:
Post a Comment