राष्ट्रवादी कार्यालयाचे बांधकाम थांबविण्याची बारामतीत 'एआयएमआयएम'ची मागणी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 6, 2023

राष्ट्रवादी कार्यालयाचे बांधकाम थांबविण्याची बारामतीत 'एआयएमआयएम'ची मागणी..

राष्ट्रवादी कार्यालयाचे बांधकाम थांबविण्याची बारामतीत 'एआयएमआयएम'ची मागणी..
 बारामती :- बारामती येथील नगरपालिकेसमोरील शारदा प्रांगणाच्या परिसरात सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम त्वरित स्थगित
करून कायदेशीर कारवाईची मागणी
'एआयएमआयएम' (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहदुल मुस्लिमीन)पक्षाचे जिल्हाध्यक्ष फय्याज ईलाही शेख यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे
केली आहे.बारामतीत आयोजित पत्रकार
परिषदेत त्यांनी सांगितले की, हे बांधकाम ज्या अटी व शर्थींना अधीन राहून करण्याच्या अटीवर परवानगी दिली आहे, त्याचे उल्लंघन करून
सुरु आहे. दिलेली परवानगी तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती व डागडुजी करिता दिली असून, कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम व खोदकाम करण्यासाठी नगरपालिकेकडून रीतसर बांधकाम
परवानगी घेणे गरजेचे असेल, असे
मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगी पत्रात
नमूद असतानाही परवानगी न घेता
डागडुजीऐवजी पक्के बांधकाम सुरु
आहे. जुने कार्यालय पाडून तेथे नवीन
कार्यालय उभारले जात आहे. या
संदर्भात चौकशी करून तातडीने हे
काम स्थगित करावे व चौकशी करून
कायदेशीर कारवाई करावी.अशी मागणी करताना पत्रकार परिषदेत माहिती दिली.

No comments:

Post a Comment