धक्कादायक...‘धनुष्यबाण' काढून घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या 'घड्याळ्या' बाबत मोठा निर्णय, निवडणूक आयोग शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 21, 2023

धक्कादायक...‘धनुष्यबाण' काढून घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या 'घड्याळ्या' बाबत मोठा निर्णय, निवडणूक आयोग शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत...

धक्कादायक...‘धनुष्यबाण' काढून घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या 'घड्याळ्या' बाबत मोठा निर्णय, निवडणूक आयोग शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत...

 नवी दिल्ली :- निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून घेतले.यानंतर आता निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाची समीक्षा निवडणूक आयोग करणार आहे.यासाठी आयोगाने पक्षाच्या प्रतिनिधीला मंगळवारी
(दि. 21) निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बोलावलं आहे. राष्ट्रवादीचा आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा तेव्हाच दिला जातो जेव्हा त्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळतात. तसेच पक्षाला लोकसभेच्या एकूण जागांच्या दोन टक्के म्हणजेच तीन राज्यांमध्ये 11 जिंकाव्या लागतात.1968 च्या सिम्बॉल ऑर्डरनुसार एखाद्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता गेली तर त्या पक्षाला देशभरातील राज्यांमध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढता येत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधीने केलेल्या अपीलावर निवडणूक आयोगाचे समाधान झाले नाही,तर राष्ट्रवादीला इतर राज्यांमध्ये पुढच्या निवडणुका घड्याळ या चिन्हावर  लढवता
येणार नाही.मात्र राष्ट्रवादीला महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा असल्याने त्यांना महाराष्ट्रात
घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवता येऊ शकते.

No comments:

Post a Comment