ब्रेकिंग न्यूज.. अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 20, 2023

ब्रेकिंग न्यूज.. अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक..

ब्रेकिंग न्यूज.. अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक..
 मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचारी यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला,जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे अनेकांना फटका बसला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी या
कर्मचाऱ्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान
भवनात एक बैठक बोलावली होती. या बैठकीत
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला असून संप मागे घेण्यात आला आहे.राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी मागील सात दिवसांपासून जुनी पेन्शन लागू करावी यासाठी संप पुकारला होता. आता तो मागे घेत
असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. संपकऱ्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं संप समन्वय समितीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आजपासून हा संप मागे घेत असल्याची
घोषणा करण्यात आली आहे.राज्यात अवकाळी पावसामुळे जी कामे प्रलंबीत आहेत ती पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असे
समितीने सांगितले आहे.त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी उद्या (मंगळवार) पासून
कामावर हजर रहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी सरकारी कर्मचारी गेल्या सात दिवसांपासून संपावर होते.आता संपकरी आणि सरकारमध्ये यशस्वी तोडगा निघाल्याचे समजतं. संपकऱ्यांच्या या मागणीसाठी
राज्य सरकारने एक अभ्यास समिती स्थापन
केली असून पुढील तीन दिवसांत त्याचा अहवाल
देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment