डॉ.आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने बारामतीत 132 वा जयंती महोत्सव हर्षउल्लासात संपन्न...
बारामती:- पुणे जिल्ह्यात व बारामती तालुक्यात तसेच बारामती मध्ये गेल्या 1 एप्रिल पासून अनेक अनेक ठिकाणी विविध प्रकारचे सामाजिक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी संलग्न असणारे कार्यक्रम राबवायला सुरुवात झाली होती मग ते प्रबोधनाच्या माध्यमातून असो व इतर सामाजिक उपकरणातून तसेच 13 एप्रिल रोजी रात्री 12 वा, डॉ, बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी त्रिशरण पंचशील पूजा पाठाचा कार्यक्रम आयोजित केला होता व डॉ, बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नागरिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले व त्यानंतर काही वरिष्ठ मान्यवरांकडून जयंती दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या... व 14 एप्रिल रोजी सकाळी 8:30 मि समितीच्या वतीने पूजा पाठाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महामानवांच्या विचारांवर ती प्रकाश टाकत शुभेच्छा दिल्या यावेळी, प्रांताधिकारी वैभव नाडवडकर, तहसीलदार विजय पाटील ,पोलीस निरीक्षक सुनील महाडिक ,माजी नगरसेवक सुधीर नाना सोनवणे, विरोधी पक्षनेते विजयरावजी गव्हाळे , माजी नगराध्यक्ष कैलास जी चव्हाण ,माजी उपनगराध्यक्ष भारत दादा अहिवळे ,माजी उपनगराध्यक्ष नवनाथ जी पप्पू बल्लाळ, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव , माजी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, हनुमंत पाटील, सचिन साबळे, अमोल वाघमारे ,अनिकेत मोहिते, भोला जगताप ,ज्ञानेश्वर दुर्वे, विक्रांत आढाव ,विजय रावजी खरात, बा न प चे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, व आदी मान्यवर उपस्थित होते...
कार्यक्रमाचे आयोजन डॉ, बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती अध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे, कार्याध्यक्ष भास्कर दामोदरे ,उपाध्यक्ष विराज अवधूते, उपाध्यक्ष संदीप रणदिवे ,उपाध्यक्ष आदित्य सोनवणे ,सचिव संजय वाघमारे, खजिनदार विशाल गायकवाड ,सहखजिनदार शंकर सोनवणे, सहखजिनदार साहिल मोरे, उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, सहकार्य अध्यक्ष शुभम गायकवाड, सहसचिव शुभम काकडे यांनी केले.असल्याचे माहिती भास्कर दामोदरे कार्याध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती यांनी दिली.
No comments:
Post a Comment