कै. छाया शेंडे यांच्या ४२ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर..! व्हेंचर स्टिल्स परिवारातर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न..! शिबिरामध्ये ९१ रक्तदातांनी उत्स्फूर्तपणे केले रक्तदान. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, April 17, 2023

कै. छाया शेंडे यांच्या ४२ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर..! व्हेंचर स्टिल्स परिवारातर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न..! शिबिरामध्ये ९१ रक्तदातांनी उत्स्फूर्तपणे केले रक्तदान.

कै. छाया शेंडे यांच्या ४२ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर..! व्हेंचर स्टिल्स परिवारातर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न..! शिबिरामध्ये ९१ रक्तदातांनी उत्स्फूर्तपणे केले रक्तदान.

बारामती (दि:१७):- कै. छाया बाबासाहेब शेंडे यांच्या जयंती निमित्त व्हेंचर स्टील्स प्रा. लि. कंपनीचे मालक बाबासाहेब शेंडे यांच्या वतीने रविवार (दि:१६) रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या रक्तदान शिबिरामध्ये ९१ रक्तदातांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
 
व्हेंचर स्टील्स  कंपनीचे मालक बाबासाहेब शेंडे यांच्या पत्नी कै. छाया बाबासाहेब शेंडे यांचा कोरोनाच्या भिषण आजारामुळे मृत्यू झाला होता. या घटनेमुळे एक जिव आणि जीवन काय असते. म्हणून एखाद्याचा जीव वाचावा. या हेतूने बाबासाहेब शेंडे यांनी आपल्या पतनी कै. छाया शेंडे यांच्या जयंतीनिमित्त थेट रक्तदन शिबिराचे आयोजन केले.
 
गेले तीन वर्षापासून बाबासाहेब शेंडे हे  रक्तदान शिबिर आयोजित करत आले आहे. यंदा देखील रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान याला  प्रतिसाद देत त्यांच्या कंपनीच्या सर्व कामगारांनी, स्टाफ तसेच शेंडे यांच्या परिवारातील सदस्यांनी देखील रक्तदान केले. एवढे न्हवे तर इतर कंपनीच्या कामगार वर्गांनी  देखील या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला. रक्तदान करण्यासाठी आलेल्या लोकांना कंपनीच्या वतीने भोजनाची सोय करण्यात आली होती. 

इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित, लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक बारामती यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले.या शिबिरासाठी डॉ. ए.बी बारवकर,सोमनाथ कवडे, सुजाता नलवडे, किरण गेजगे,प्रयोगशाळा तंत्रज्ञ, इतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment