अजित पवार यांच्याकडे आहेत भाजपसोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्या?
मुंबई :- महाराष्ट्रात नवं राजकीय भूकंप होणार याच्या वावड्या उठत असल्या तरी नक्की राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार का?नुकताच एक वृत्त पत्रात बातमी आली होती की,राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राज्यभरात सुरू आहे. अजित पवार भाजपसोबत युती करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची जागा घेण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या ५३ पैकी सुमारे ४० आमदारांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीच्या या आमदारांनी अजित पवार
यांना संमतीच्या सह्या दिल्या आहेत. योग्य वेळ
आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल,असे वृत्त द न्यू इंडियन एक्स्प्रेसने राष्ट्रवादी पक्षातील सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
No comments:
Post a Comment