काय म्हणता...अर्बन बँकेच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल;निवडणुकीत बोगस मतदानाचा प्रयत्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 16, 2023

काय म्हणता...अर्बन बँकेच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल;निवडणुकीत बोगस मतदानाचा प्रयत्न..

काय म्हणता...अर्बन बँकेच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल;निवडणुकीत बोगस मतदानाचा प्रयत्न..
नगर :- रविवारी झालेल्या मतदानाच्यावेळी बोगस
मतदानाचा प्रयत्न झाला. याप्रकरणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या
नियामक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी
शेवगावमध्ये रविवारी झालेल्या मतदानाच्यावेळी बोगस मतदानाचा प्रयत्न झाला. याप्रकरणी नगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालक कमलेश हस्तीमल गांधी व त्यांचा साथीदार आदित्य भाऊसाहेब शिंदे (दोघे रा. शेवगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.मतदानासाठी आलेल्या दोघांबद्दल उमेदवार प्रतिनिधी सविता मोरे (रा. नगर) यांना संशय आल्याने त्यांनी त्यांचा हात पकडून सखोल चौकशी सुरू केल्यावर दोघेही त्यांचा हात झटकून पळून गेले.या प्रकरणी नाट्य परिषदेचे शेवगावचे निवडणूक निर्णय अधिकारी शिरीषकुमार जानोरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेवगाव पोलिसांनी गांधी व शिंदे
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेवगावच्या भारदे हायस्कुलमध्ये रविवारी मतदान सुरू असताना दुपारी 1च्या सुमारास दोनजण मतदानासाठी आले.उमेदवार प्रतिनिधी असलेल्या सविता मोरे (रा. नगर)यांनी त्यांचे आधार कार्ड पाहिल्यावर ते बनावट असल्याचा संशय त्यांना आला. त्यामुळे त्यांच्याकडून
अधिक माहिती घेत असताना दोघांनी त्यांना
उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी त्यांच्या हाताला पकडले असता ते हाताला झटका देऊन पळून गेले. हे दोघेही बोगस मतदानासाठी आले होते, अशी तक्रार करून त्यांचे आधार कार्ड मोरे यांनी निवडणूक अधिकारी जानोरकर यांना दिले. त्यावर कमलेश हस्तीमल गांधी व आदित्य भाऊसाहेब शिंदे(रा. शेवगाव) अशी नावे होती. हे दोघेही तोतयेगिरी करून मतदानासाठी आल्याचे लक्षात आल्यावर जानोरकरांनी नाट्य परिषदेच्या वरिष्ठांना माहिती दिली व पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यातील आरोपी कमलेश गांधी नगर अर्बन बँकेचा संचालक असल्याने जिल्हाभरात तो चर्चेचा विषय झाला आहे.नाट्य परिषदेच्या नगर जिल्ह्यातील तीन जागांसाठी रविवारी नगर शहरात तसेच शेवगाव व संगमनेर येथे मतदान प्रक्रिया झाली. या निवडणुकीत उमेश
घेवरीकर, क्षीतिज झावरे, संजयकुमार दळवी, शशिकांत नजन, सतीश लोटके व श्याम शिंदे असे सहा उमेदवार आहेत. जिल्हाभरात बाराशेवर मतदार आहेत. यापैकी सुमारे 990 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
अन्य ठिकाणी शांततेत व उत्साहात मतदान झाले, पण शेवगावला बोगस मतदानाचा प्रयत्न झाल्याने निवडणुकीला गोलबोट लागले.

No comments:

Post a Comment